ही आहेत सातारा जिल्ह्याची कोरोना लढ्यातील दोन बलस्थाने

ही आहेत सातारा जिल्ह्याची कोरोना लढ्यातील दोन बलस्थाने
Updated on

सातारा : निकटच्या सहवासितांचे दोनदा घशातील स्त्रावाचे नमुने घेण्याच्या सातारा पॅटर्नमुळे कोणतीही लक्षणे नसताना जिल्ह्यातील 80 टक्के रुग्ण शोधण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. त्याचबरोबर जनजागृती, प्रतिबंधित क्षेत्रात पूर्णत: लॉकडाउन व कान्टॅक्‍ट ट्रेसिंगवर घेतलेल्या अधिक परिश्रमामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित राखण्यात जिल्हा प्रशासनाला यश येत आहे. त्याचबरोबर मृत्यू दर कमी ठेवण्यातही जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. 

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नागरिकांच्या जनजागृतीवर अधिकभर दिला होता. दोघे सातत्याने व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करत होते. त्याचबरोबर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा प्रतिबंधित क्षेत्रात अधिक कडक उपाययोजना साताऱ्यात राबविण्यात आल्या. त्याचा परिणाम सातारा व कऱ्हाडमध्ये कोरोना प्रसाराचा वेग रोखण्यात झाला. सर्वात महत्त्वाचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर जिल्हा प्रशासनाने अधिक भर दिला. 

एखादा कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर त्याच्याशी सखोल चर्चा करून त्याची जीवन शैली, सवयी, पूर्व इतिहास याची माहिती मिळवण्यावर भर देण्यात आला. त्यातून गेल्या 15 ते 20 दिवसांत तो कोठे गेला, कोणाशी बोलला याची माहिती मिळविण्यात आली. तो खरे बोलतो आहे का, हे पाहण्यासाठी पोलिसांच्या मदतीने संबंधित व्यक्तीच्या सर्व मोबाईल क्रमांकाचे सिडीआर काढण्यात आले. त्यातून मिळालेल्या टॉवर लोकशेनशी आणि त्याने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यावरून तो व्यक्ती कुठे खोटे बोलतोय, त्याच्याकडून आणखी कोणत्या ठिकाणांची माहिती काढणे गरजेचे आहे, हे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या गोष्टीच्या माध्यमातून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती प्रशासनाने मिळविली. 

त्यातून हाय रिस्क व लो रिस्क अशी विभागणी करून हाय रिस्कमध्ये असलेल्या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील नागरिकांची एकदाच चाचणी घेण्याचे राज्य शासनाच्या निर्देश आहेत; परंतु जिल्ह्यात फलटणमधील एक महिला 20 दिवसानंतर पॉझिटिव्ह आली. त्यानंतर शासनाने बाधित रुग्णाच्या निकटच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची पहिली चाचणी निगट्टिव्ह आली, तरी 14 दिवसांनंतर त्याची पुन्हा चाचणी घेण्याची पद्धत अवलंबिली. त्यामुळे कोणतीही लक्षण दिसण्यापूर्वीच म्हणजे कोरोनाची संसर्ग तीव्र होण्यापूर्वी जिल्ह्यातील 90 टक्के बाधितांना शोधण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४८४ रुग्णांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला, तर जिल्ह्यातील कोरोनाची बाधा झालेल्या १४२ जणांना जणांना पूर्ण बरे करून घरी सोडण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व दोनदा स्वॅप या पॅटर्नमुळे जिल्ह्यात कोरोना प्रसार रोखण्यात व मृत्युदर कमी ठेवण्यात मदत झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.