सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असताना जिल्हा प्रशासनाची कोरोनाशी एकतर्फी लढाई सुरू असून, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र, सर्व काही शासनावर ढकलून गप्प बसलेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने पुढे येऊन कोविड हॉस्पिटल अथवा कोरोना केअर सेंटर उभारण्याचे धाडस दाखविलेले नाही. त्यामुळे उपचाराविना रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कृती करून रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी कोविड हॉस्पिटल, कोरोना केअर सेंटर उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
आम्हांला लाेकं महत्वाची पैसे नाही
जिल्ह्यावर एखादे संकट आले तर यापूर्वी प्रशासनाच्या पुढे एक पाऊल जाऊन लोकप्रतिनिधी पुढाकार घेत असत; पण आता कोरोनाच्या महामारीमध्ये मात्र, उलटे चित्र दिसू लागले आहे. सर्व काही शासन आणि प्रशासनावर ढकलून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केवळ सूचना करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. सामाजिक भावनेतून काही निवडक संस्था, व्यक्तींनीच पुढाकार घेतल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाशी बाधित रुग्णांसोबत केवळ प्रशासनच लढत असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग केवळ सूचना देणे इतकाच राहिल्याचे दिसत आहे.
जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर डॅशिंग अधिकारी मुंडेंची नजर?
जिल्ह्यात विधान परिषदेच्या सभापतींसह दोन मंत्री, तीन खासदार व आठ आमदार आहेत. यामध्ये भाजपचे दोन खासदार, राष्ट्रवादीचा एक, तसेच आठ आमदारांपैकी तीन आमदार राष्ट्रवादीचे, कॉंग्रेसचा एक, शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 17 हजारांवर गेला असून, प्रत्यक्ष सात हजार 427 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले असून, आतापर्यंत 462 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दररोज यामध्ये भर पडत आहे.
सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय
जिल्ह्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता उपचाराची सुविधा कमी पडू लागली आहे. तब्बल सहा ते सात महिने झाल्यानंतर रुग्णांना बेड कमी पडू लागल्यावर जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी जागे झाले आहेत. त्यांनी जंबो हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत सर्वकाही अलबेल आहे, असेच चालले होते. आता संख्या हाताबाहेर जाऊ लागली आहे. कोरोनाशी केवळ प्रशासकीय पातळीवरच एकतर्फी लढाई सुरू आहे. जिल्ह्यातील डझनभरापेक्षा जास्त लोकप्रतिनिधींकडून कोणतीच उपाययोजना आपल्या जनतेसाठी होत नाही. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले त्या वेळी त्यांनी सहकारी साखर कारखान्यांनी पुढे येऊन कोविड हॉस्पिटल किंवा कोरोना केअर सेंटर सुरू करावे, असे आवाहन केले होते; पण जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने आजपर्यंत याचे धाडस दाखविले नाही.
अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सह्याद्री साखर कारखाना सक्षम आहे. मात्र, त्यांनीही याबाबत कोणतीच भूमिका घेतली नाही. एकूणच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केवळ बैठका घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना करणे इतकेच काम करताना दिसत आहेत. यातून साध्य काहीही होत नाही. परिणामी वाढत्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी वेळेत बेड मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. अजूनही वेळ गेली नाही. जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी शासनाची वाट न पाहता तातडीने एक पाऊल पुढे टाकत किमान प्रत्येक कारखान्यावर एक कोरोना केअर सेंटर त्या-त्या तालुक्यातील रुग्णांसाठी उभारण्याचे धाडस दाखवावे, अशी अपेक्षा या निमित्ताने सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
कऱ्हाडकर शासनाच्या भरवशावर!
कऱ्हाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिणचे दोन आमदार असून, बाळासाहेब पाटील हे पालकमंत्री, तर पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, तर शेजारच्या पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई गृह राज्यमंत्री आहेत; परंतु कोरोनासाठी या नेत्यांकडून स्वत:हून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. केवळ शासनाच्या भरवशावर ही नेते मंडळी बसल्याचे चित्र आहे.
गुड न्यूज : कऱ्हाडला नव्याने 635 बेड; काेठे किती वाढले वाचा सविस्तर
संपादन : सिद्धार्थ लाटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.