मराठवाडी धरणस्थळावर कोरोनाचा फैलाव; अकरा कामगार बाधित

Corona
CoronaMedia Gallery
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडी धरणस्थळावर (marathwadi dam) कोरोनाचा (coronavirus) फैलाव झाला असून, ११ कामगार बाधित आढळल्याने धरण व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधितांपैकी अनेकजण परप्रांतीय असून, कोरोना केअर सेंटरबरोबरच काहींवर कोविड हॉस्पिटलमध्येही उपचार सुरू आहेत. कोरोनाची एन्ट्री झाल्यामुळे धरणाच्या बांधकामावरही थोडाफार परिणाम जाणवत आहे. (satara-coronavirus-news-11-workers-tested-positive-marathwadi-dam)

मराठवाडी धरणाच्या बांधकामावर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कामगार कार्यरत आहेत. धरणस्थळी पत्र्याच्या शेडवजा खोल्यांमध्ये ते राहतात. सहा दिवसांपूर्वी तीन कामगारांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जाधव व त्यांचे सहकारी संदीप साळुंखे, सिद्धार्थ गवई, शंतुनू पाटील, मेघा मराठे, कांता बर्डे, स्वाती थोरात, डी.एस. करवते आदींनी धरणस्थळी चाळीसभर कामगारांची चाचणी केली असता त्यातील आठ जण पॉझिटिव्ह आढळले. काहींना तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

Corona
पैशासाठी मुलांनी आईला रस्त्यावर फेकले; पाेलिसांत तक्रार दाखल

११ बधितांपैकी तिघांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या २० जणांची आरटीपीसीआर टेस्टही घेण्यात आली असून, त्याचा अहवाल रात्रीपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे रुग्णसंख्या आणखीन वाढण्याची भीती आहे. अकराही रुग्णांच्या संपर्कातील लोकांची चार दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून आज सांगण्यात आले.

बाधितांपैकी अनेक कामगार सेन्ट्रींगचे काम करणारे आहेत. कोरोनाच्या फैलावाचा थोडाफार परिणाम धरणाच्या बांधकामावरही दिसून येत आहे. जंतुनाशक फवारणीसह विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, सर्व कामगारांना आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभाग व धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Corona
पांडवकालीन श्री क्षेत्र मेरुलिंग

कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आम्ही आरोग्य यंत्रणेच्या सतत संपर्कात आहोत. लवकरच मराठवाडी धरण परिसर कोरोनामुक्त होईल अशी माहिती सुरेन हिरे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग यांनी दिली.

Corona
सातारा : बाधितांची संख्या घटली; जाणून घ्या पाॅझिटिव्हीटी रेट
Corona
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी क्लासेसची गरज नाही : तेजस्विनी चोरगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.