सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार 'या' याेजनेचा मोफत लाभ

सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार 'या' याेजनेचा मोफत लाभ
Updated on

सातारा : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत असल्यामुळे उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांना खरा आधार दिलाय तो महात्मा फुले जनआरोग्य योजनेने. केशरीसह शुभ्र रेशनकार्डधारकांनाही येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेतून उपचार मिळणार आहेत. केवळ कोरोनाच नव्हे तर इतर रोगांवरही मोफत उपचार मिळत आहेत. मार्च ते जूनअखेर जिल्ह्यातील तब्बल साडेसहाशे कोरोनाबाधितांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळाले आहेत. या योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयांतही कोरोनाबाधितांवर मोफत उपचार होणार आहेत.
साताऱ्यात या गाेष्टींसाठी बंदी; काळजी घ्या,सतर्क रहा  

मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात सापडला आणि एकच खळबळ उडाली. पदेशातून प्रवास करून आलेल्यांचा यामध्ये समावेश होता. साधारण दहा रुग्णसंख्येवर कोरोना थांबलेला होता. मात्र, बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. आता तर दररोज 20 ते 40 पटीत रुग्ण सापडत आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1145 असून, त्यापैकी 354 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आज 38 नवे बाधित आढळले आहेत. आतापर्यंत 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 743 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे. रुग्णसंख्या वाढतच राहिल्यास उपचार कोठे करायचे, तर खासगी रुग्णालयांत उपचार करणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा कोरोनाबाधितांना आधार मिळाला आहे. या योजनेतून आतापर्यंत अंत्योदय, दारिद्य्ररेषेखालील व केशरी रेशनकार्डधारकांवर मोफत उपचार होत होते. पण, शासनाने 31 जुलैपर्यंत सफेद कार्डधारकांनाही या योजनेतून मोफत उपचार देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालये, या योजनेत येणाऱ्या खासगी हॉस्पिटलमध्येही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेतून जिल्ह्यातील साडेसहाशे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनात महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी आधार ठरली आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात कोरोनाबाधितांवर मोफत उपचार मिळणार आहेत. त्यासाठी खासगी रुग्णालयांतील काही खाटा आरोग्य विभागाने ताब्यात घेतल्या आहेत. यापूर्वी 85 टक्के लोक या योजनेच्या कार्यकक्षेत होते. मात्र, आता सफेद रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांतील व्यक्तींनाही या योजनेत सामावून घेतले आहे.

पालिका, नगरपंचायतींसाठी महत्त्वाचे : पथविक्रेता समित्या करणे अनिवार्य
 
Video : जुलमी इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी; मेढ्यात कॉंग्रेसचे धरणे आंदाेलन

रुग्ण वाढल्यास मुदतवाढ 

आगामी काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास रुग्णांवर उपचारासाठी खाटा कमी पडू नयेत तसेच कोरोना नसलेल्या रुग्णांनाही वेळेत व व्यवस्थित उपचार मिळावेत, यासाठी शासनाने याची अंमलबजावणी 31 जुलैपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहून या योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे. 

Video : पोवई नाक्‍यापर्यंत सर्व काही अतिक्रमण समजावे का? उदयनराजे 

कोरोनायोद्धा बनून हे करताहेत आरोग्य खात्याला मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.