"साहेब तुम्हीच सांगा, आता आम्ही जगायचं कसं?'

रुग्णालयातील इतर कामासह रुग्णांचे व नातेवाईकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठीही प्रयत्नशील असल्याने रुग्णसेवा केल्याचे समाधान या सुरक्षा रक्षकांकडून व्यक्त होत आहे.
Depressed-man.jpg
Depressed-man.jpggoogle
Updated on

गोंदवले (जि. सातारा) : जिवावर उदार होऊन कार्यरत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना (security guard) गेले 15 महिने पगारच (salary) मिळालेला नाही. कोरोना (corona) काळात आर्थिक आपत्तीत सापडलेल्या या रक्षकांकडून "साहेब तुम्हीच सांगा, आता आम्ही जगायचं कसं?' असा सवाल उपस्थित केला जात आहे. (satara-covid19-gonadavale-security-employee-demands-for-pending-salary)

कोरोनाच्या आपत्तीमुळे गेल्या वर्षभरात सर्व जण संकटात सापडले आहेत. या आपत्तीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध स्तरातील कोरोनायोद्धेदेखील कार्यरत आहेत. या योद्‌ध्यांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामीण रुग्णालयाचे सर्वच कर्मचारी झटत आहेत. या भागातील कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून माणदेशी फाउंडेशनच्या पुढाकारातून गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात 25 ऑक्‍सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सर्व सोयींनीयुक्त असणाऱ्या या रुग्णालयातून रुग्ण लवकर बरे होत असल्याने तालुक्‍यातून कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. या रुग्णालयात सुरक्षा मंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे रक्षक सुरक्षेबरोबरच कोविड लसीकरणाच्या कामात मदतीसह गाडीतून ऑक्‍सिजन सिलिंडर उतरण्याची जोखमीची कामेदेखील सौजन्याने करत आहेत. रुग्णालयातील इतर कामासह रुग्णांचे व नातेवाईकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठीही प्रयत्नशील असल्याने रुग्णसेवा केल्याचे समाधान या सुरक्षा रक्षकांकडून व्यक्त होत आहे.

Depressed-man.jpg
काेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर

गेल्या काही दिवसांत कोरोना लसीकरण विस्कळित झाल्याने रुग्णालयात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यावेळीदेखील सुरक्षा रक्षकांकडून महत्त्वाची भूमिका पार पडली जात आहे. या आपत्ती काळात अविरतपणे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मात्र गेले तब्बल 15 महिने पगारच मिळालेला नाही. त्यामुळे आता हे रक्षक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. काम करूनही हातात दाम नसल्याने "साहेब, आता तुम्हीच सांगा, आम्ही जगायचं कसं?' असा उद्विग्न प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

पगाराविना कुटुंब चालविण्यासाठी उसनवारी करून प्रयत्न केला. पण, सगळेच पर्याय संपल्याने आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली असून शासनाने लवकरात लवकर पगार द्यावा अशी मागणी सर्वांच्यावतीने गणेश भांडवलकर, किशोर काटकर (सुरक्षा रक्षक, ग्रामीण रुग्णालय, गोंदवले खुर्द) यांनी केली आहे.

सुरक्षा रक्षकांच्या थकीत वेतनाबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्यासह जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला असून अनुदान मिळताच वेतन देण्यात येईल असे डॉ. सुभाष चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा) यांनी नमूद केले.

Depressed-man.jpg
महाबळेश्वर : ...तरच लॉकडाउनचे नियम शिथिल होतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.