काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोळ्यादेखत मूकबधिर मुलगा बंधाऱ्यात बुडाला; मूकबधिर आईलाही ओरडताही आलं नाही अन्..

Man River : आईसमोरच मुलगा बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Satara Crime
Satara Crimeesakal
Updated on
Summary

हणमंत शेंबडे हा सातारा येथील मूकबधिर विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गणेशोत्सवामुळे (Ganeshotsav) चार दिवस सुटी असल्याने तो गावी आला होता.

म्हसवड : येथील शेंबडेवस्ती येथे आईसोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेला मूकबधिर मुलगा माण नदीपात्रातील (Man River) बंधाऱ्यात बुडाला. हणमंत मोहन शेंबडे (वय १८, रा. शेंबडेवस्ती- म्हसवड) असे त्याचे नाव असून, त्याचा शोध सुरू आहे. काल दुपारी एकच्या सुमारास म्हसवड पालिकेच्या (Mhaswad Municipality) नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ शेंबडेवस्तीवरील बंधाऱ्यात ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.