कोल्हटकर आळी, चिमणपु-यातील महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

दोन्ही ठिकाणी सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली.
Crime News
Crime NewsSystem
Updated on

सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजवाडा मंडई व मंगळवार तळे परिसरात काल दहा मिनिटाच्या आत चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या आहेत. मंजिरी विजय कोल्हटकर (वय 68, रा. मंगळवार पेठ, कोल्हटकर आळी ) या काल सायंकाळी पाचच्या सुमारास राजवाडा मंडईच्या गेटसमोर होत्या. या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. याबाबत त्यांनी फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

या घटनेनंतर दहा मिनिटांच्या अंतरातच मंगळवार तळ्यावर दुसरी घटना घडली. चिमणपुरा पेठेत राहणाऱ्या कोमल विवेकानंद जगदाळे (वय 52, रा. चिमणुपरा पेठ) या सव्वापाचच्या सुमारास मंगळवार तळ्यावरील डॉ. गोखले यांच्या दवाखान्यासमोरील शीतल मेडिकलसमोर होत्या. या वेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखींनी त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. याबाबत त्यांनीही काल रात्री उशिरा फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत. दोन्ही ठिकाणी सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली.

चंदननगरला विदेशी दारू जप्त

सातारा : चंदननगर (कोडोली, ता. सातारा) परिसरातून शहर पोलिसांनी 39 हजार 360 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी राहुल रामचंद्र गोडसे (वय 29, रा. खिंडवाडी, ता. सातारा) आणि महेंद्र नामदेव चोरगे (वय 46, रा. गोळीबार मैदान, गोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यकाडून 50 हजार रुपयांच्या ह्युंडाई कारसह 39 हजार 360 रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सैनिकनगर परिसरातून दुचाकी लंपास

सातारा : सैनिकनगर परिसरातून चोरट्याने दुचाकी लंपास केली आहे. याबाबत उत्तम कल्याण दंडगुले (रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार इष्टे तपास करत आहेत.

दांपत्याला जखमी केल्याने कार चालकावर गुन्हा

सातारा : सैदापूर ते लिंब रस्त्यावर दुचाकीवरील पती- पत्नीला जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम उद्धव इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत वैभव गुलाबराव फाळके (रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ अमर व त्याची पत्नी शीतल हे अमृतवाडी (ता. वाई) येथून दुचाकीने साताऱ्याकडे येत होते. सैदापूर ते लिंब खिंड रस्त्यावर विठ्ठल मंगलम कार्यालयाजवळ त्यांना एका चारचाकी गाडीने धडक दिली. त्यामध्ये ते दोघे जखमी झाल्याचे वैभवने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार महांगडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.