अब्रूची बेअब्रु होईल, भीतीने व्यापाऱ्याने मुलीस 15 लाख दिले

पीडित व्यापाऱ्यास पोलिसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी मुलीसह अन्य पाच जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
arrest
arrestteam esakal
Updated on
Summary

पीडित व्यापाऱ्यास पोलिसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी मुलीसह अन्य पाच जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

फलटण शहर (जि. सातारा) : हनी ट्रॅपद्वारे शहरातील एका भेंडी व्यापाऱ्यांकडून 15 लाख 50 हजार रुपयांची खंडणी ransom उकळल्याप्रकरणी एका मुलीसह girl सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी phaltan police दोघांना अटक केली असून, एक संशयित यापूर्वीच अन्य गुन्ह्यामध्ये अटकेत आहे. satara-crime-news-phaltan-police-arrested-two

शहरातील एका भेंडी व्यापाऱ्यास 15 मे 2020 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अजित घोलप (रा. नागेश्वरनगर, चौधरवाडी, ता. फलटण) याने फलटण येथे भेंडीचा व्यापारी आला असून, ते भेंडी घेणार असल्याचे सांगितले. तो त्यांना तिकडे दुचाकीवरून घेऊन गेला. त्या ठिकाणी एक मुलगी, राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हेही बसले होते. त्यांनी तेथे व्यापाऱ्यास मारहाण केली व त्याचे कपडे काढून त्याला मुलीच्या अंगावर ढकलून देत त्याचे फोटो काढले. तेथून गिरवीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यात अजित घोलप व विजय गिरी गोसावी यांनी जबरदस्तीने व्यापाऱ्यास दुचाकीवर मध्ये बसवून घेऊन गेले. तेथे राजू बोके, मनोज हिप्परकर व रोहित भंडलकर हे दुचाकीवरून आले. त्या सर्वांनी मिळून भेंडी व्यापाऱ्यास दमदाटी व मारहाण केली. या वेळी रोहित भंडलकर याने व्यापाऱ्याच्या तोंडात लघुशंका केली.

arrest
तळबीडचा कक्ष ठरतोय रुग्णांचा आधार, 'आरोग्य'कडून गोरगरीबांवर मोफत उपचार

पोलिस ठाण्यामध्ये जाऊन त्या मुलीस तुझ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार द्यायला सांगतो, अशी भीती दाखवत व दमदाटी करीत 20 लाख रुपयांची मागणी व्यापाऱ्याकडे करण्यात आली. अब्रूची बेअब्रु होईल, या भीतीने संबंधित व्यापाऱ्याने त्यांना 15 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. पीडित व्यापाऱ्यास पोलिसांनी सुरक्षिततेची ग्वाही दिल्याने त्यांनी मुलीसह अन्य पाच जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी मनोज हिप्परकर व विजय गिरीगोसावी यास अटक केली आहे. अन्य संशयित राजू बोके हा अन्य गुन्ह्यात यापूर्वीच अटकेत आहेत. या प्रकरणातील संशयित मुलीसह व अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

arrest
साता-यातील लाॅकडाउन जूनअखेर पर्यंत वाढणार?; रेड झाेनचा धस्का

भिऊ नका.. तक्रार द्या...

फलटण शहरात अन्य कोणाबाबत हनी ट्रॅपची घटना घडली असेल, त्यांनी न भीता पुढे यावे व तक्रार द्यावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल, असे फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.