कऱ्हाडात गुंडांच्या टोळ्यांवर फास आवळण्यास सुरवात; पोलिसांची 800 जणांवर धडक कारवाई

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. शहर परिसरतील दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या संशयितांवर सरसकट प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे. त्याचाच भाग म्हणून शहर पोलिसांनी सहा महिन्यांत तब्बल 800 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. 

सात महिन्यांत गुंडांच्या तीन टोळ्यांसह पोलिस रेकॉर्डवरील दहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शहरातील अद्यापही दोन टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे, दहा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पालिकेच्या निवडणुका यंदाच्या वर्षाच्या अखेरीस आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याबरोबर गुन्हेगारांच्याही हालचाली वाढत आहेत. ती स्थिती लक्षात घेऊन शहर पोलिसांनी सरसकट संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. 

पोलिसांच्या "डीबी'ने आजअखेर तब्बल 800 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सात महिन्यांत तीन टोळ्या हद्दपार झाल्या आहेत. चार दिवसांपूर्वी तिसरी टोळी हद्दपार केली आहे. त्यापूर्वी सोळवंडेच्या टोळीला जुलै 2020, तर झेंडेच्या टोळीला जानेवारीमध्ये हद्दपार केले आहे. गुंड जुनेद शेखच्या टोळीला दोन दिवसांपूर्वी हद्दपार केले आहे. या टोळीतील अमीर शेखवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यानुसार स्थानबद्धतेची जिल्ह्यातील दुसरी कारवाई शहर पोलिसांनी केली. तीन टोळ्यांतील 17 जण दोन वर्षांसाठी हद्दपार आहेत. अन्य गुन्ह्यातील नऊ संशयित स्वतंत्रपणे हद्दपार झाले आहेत. 

पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अजूनही कारवाईचा फास आवळणार आहेत. त्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर थेट प्रतिबंधात्मक कारवाई होईल. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील गुन्हा दाखल असलेल्या राजकीय संशयितांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. पोलिसांनी आणखी दोन टोळ्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे दाखल केले आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त आणखी दहा जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल आहेत. त्याचाही निकाल होणार असल्याने शहरातील गुन्हेगारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत. 

सहकारमंत्र्यांनी धाडस दाखवावे; पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे तरी ऐकावे

पालिकेच्या निवडणुका शांततामय व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी शहर पोलिस प्रयत्नशील आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्यांवर थेट प्रतिबंधात्मक कारवाई होईल. त्याची कार्यवाही लवकरच हाती घेतली जाईल. 

-विजय गोडसे, सहायक पोलिस निरीक्षक, कऱ्हाड 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.