प्रेमीयुगुलांनो! तुम्हाला लुटणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड; सोलापूर, बारामतीतील सहा जणांना अटक

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळजवळील वीर धरण परिसरात प्रेमीयुगुलांना व पर्यटक नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. पर्यटक म्हणून आलेल्या प्रेमीयुगुलांना व नागरिकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनेनुसार लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्याकरिता शिरवळ पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस अंमलदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, धीरज यादव, अमोल जगदाळे व स्वप्नील दौड यांचे पथक तयार करण्यात आले. 

या ठिकाणी गस्त घालताना परिसरामध्ये तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत दुचाकीवर संशयितरीत्या युवक फिरताना आढळून आले. या वेळी पोलिसांनी हटकले असता ते पळाले. त्याचवेळेस शिरवळ पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरील महावीर सुखदेव खोमणे (वय 23, रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शाहरूख महमुलाल बक्षी (वय 24, मूळ गाव मार्डी, ता. माण सध्या रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), भैय्या हुसेन शेख (वय 25, रा. कांबळेश्वर, ता. बारामती, जि. पुणे) व 17 वर्षीय अल्पवयीन युवक या चौघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 13 इंच लांबीची कुकरी, 7.5 इंचांचा नक्षीदार चाकू अशी धातक शस्त्रे मिळून आली. 

अन्य दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असता लोणंदजवळ फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी लोणंद येथे मोठ्या शिताफीने अमीर मौल्लाली मुल्ला, (वय 21, रा. चंद्रपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व मयूर अंकुश कारंडे (वय 20 वर्ष, रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेत शिरवळ पोलिसांच्या स्वाधीन केले, असे सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आज खंडाळा न्यायालयात हजर केले असता सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.