पीक कर्जासाठी गावनिहाय शिबिरे घ्या : जिल्हाधिकारी शेखर सिंह

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक बँक शाखांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह
जिल्हाधिकारी शेखर सिंहSakal
Updated on

सातारा : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक बँक शाखांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अग्रणी बँक सल्लागार समितीची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, बँक ऑफ महाराष्ट्र अंचल प्रबंधक अपर्णा जोगळेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, रिझर्व्ह बँकेचे नरेंद्र कोकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी पीक कर्ज वाटपामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी शेखर सिंह
निलेश राणे शरद पवारांना टोला लगावण्याच्या नादात विसरले फॅक्ट

श्री. सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, उद्योग, शैक्षणिक यासह विविध कर्ज प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे. जिल्ह्यात उद्योग निर्माण व्हावेत, यासाठी बँकांकडील विविध योजनांची प्रकरणे पडताळणी करून मंजूर करावीत, तसेच अनुसूचित जातीकरिता असलेल्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत तालुकानिहाय प्रकरणे मंजूर करावी.

जिल्ह्यातील महिला बचत गटांना उद्योग उभारणीसाठी चांगल्याप्रकारे कर्ज वाटप झाले आहेत. महिला बचत गटांच्या बँक खाती उघडण्यासाठी बँकांनी बचत गटांना साहाय्यता करावी.’’ महामंडळाकडील विविध योजनांची कर्ज प्रकरणे आहेत, तेही बँकांनी लवकरात लवकर मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.