अखेर प्रशासनाने म्हसवडचे 'ते' काेविड रुग्णालय केले बंद

अखेर प्रशासनाने म्हसवडचे 'ते' काेविड रुग्णालय केले बंद
Updated on

म्हसवड (जि. सातार) : शासनाने गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक नजिकच सुरु केलेले कोवीड रुग्णालय इतरस्त्र स्थलांतरीत करावे, रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांची आवश्यक त्या संख्येने नियुक्ती करावी, व कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार करावेत या मागणीसाठी येथील नागरिकांनी बसस्थानक नजिक सातारा पंढरपुर रसत्यावर घोषणाबाजी करीत आंदोलन सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांना लेखी निवेदन दिले.

या आंदोलनानंतर शासनाने संबंधित धन्वंतरी कोवीड हॉस्पिटल तातपुरते बंद करुन येथील कोरोनाबाधित रुग्ण शहरापासुन दूर अंतरावरील जय भगवान हॉस्पिटल अधिग्रहण करुन तेथे कोवीड रुग्णालय सुरु केले व रुग्णास दाखल केले. म्हसवड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे शासनाने स्थानिक पातळीवर रुग्णालय सुरु करावे या मागणीसाठी नागरिकांनी गेल्या आठवड्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तीन वेळा आंदोलन केले.

पृथ्वीराजबाबांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही

या आंदोलनानंतर खटाव-माणचे प्रांताधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्यधिकारी आदींनी येथील धन्वंतरी, दोलताडेव, जय भगवान या तीन खाजगी रुग्णालयांची पहाणी करुन ही सर्व रुग्णालये अधिग्रहण करुन ताब्यात घेण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. परंतु राजकीय दबावाने एकच तेही नेहमीच गर्दी असलेल्या येथील बसस्थानक लगतचे धन्वंतरी हॉस्पिटल प्रांताधिकारी अश्निनी जिरंगे यांनी संबंधितास तोंडीच सुचना देत अधिग्रहीत केले. ते शासकीय आरोग्य खात्याच्या स्वाधीन करुन बेफिकीरपणे आपली जबाबदारी पुर्ण केली. त्याच दिवशी त्यांनी घाईघाईने या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखलही केले असे आंदाेलनकर्त्यांनी नमूद केले.

दुष्काळी तालुक्‍यात पाऊस मोठा; तरीही जलसाठ्यात पाण्याचा तोटा 

हे कोवीड रुग्णालय शासनाच्या आरोग्य खात्याअंतर्गत सुरु केले परंतु: या रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णास नलिकेद्वारे ऑक्सिजन पुरवठा करणा-या यंत्र सामुग्रीचे तज्ञ डॉक्टर, क्ष यंत्र तज्ञ,नर्सेस, वॉर्ड बॉय,स्वच्छता कामगार यांची नेमणूकच न केल्यामुळे हे संपुर्ण हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकाच कर्मचा-यावर सुरु ठेवले गेले.

राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आल्यास विकास साधता येतो : सुनंदा पवार

रुग्णालयात योग्य त्या पात्रतेचे तज्ञ डॉक्टर नर्सेस नसल्यामुळे रुग्णांना पहिल्याच दिवसापासुन याेग्य सुविधा मिळाल्या नाहीत. या कोवीड रुग्णालयात स्वच्छता कामगार नियुक्तीही केली नसल्यामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून उपचारासाठी दाखल केलेले कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह अंत्यविधीपुर्वी त्याच बेडवर इतर रुग्णांच्या बेड शेजारीच बारा ते चौदा तास तसेच ठेवले जात असल्यामुळे त्या नजिकचे इतर रुग्ण घाबरुन जाण्याचे प्रकार घडले तसेच उपचारासाठी दाखल केलेल्या मृत रुग्णांचे मृतदेह अंत्यविधीस नेल्यानंतरही संबंधित मृताच्या बेडचे निर्जंतुकिकरण केले जात नाही असल्यामुळे रुग्णालय शासन व आरोग्यखाते मनमानी पध्दतीने बेफिकीरपणे हे कोवीड रुग्णालय चालवत असल्याचे निदर्शनास येऊ लागल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे धाडसच करीत नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येऊ लागल्यामुळे तसेच याच रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर धन्वंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टरांचे कुटुंब राहत असुन या कुटुंबास बाहेर येण्या जाण्याचा रस्ता याच हॉस्पिटल मधूनच असल्यामुळे संबंधित डॉक्टरसह त्यांची पत्नीसह कर्मचारीही कोरोनाबाधित झाल्याची घटना घडल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले. धन्वतंरी हॉस्पिटलमधील डॉक्टर कुटुंबातील सर्व आरोग्याच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असेही आंदाेनकर्त्यांनी सांगितले.

आमदारांच्या एका हाकेत उद्योगपतीने दिली लाखांची रेमडिसिव्हर इंजेक्‍शन्स

या रुग्णालयाच्या इमारतीत मेडीकल स्टोअर्स व बँकेच एटीएम व बसस्थानक सातारा-पंढरपुर रस्त्यावरुन नागरिकांची सातत्याने वर्दळ असल्यामुळे हि सर्व नागरिकांच्या गर्दीची ठिकाणे या कोवीड रुग्णालयामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा वावर सुरु झाल्यामुळे लगतच्या व्यावसायिक व दुकानदारसह नागरिकांस कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात असल्यामुळे संबंधित कोवीड रुग्णालय सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे व रुग्णालयात आवश्यक त्या संख्येने कर्मचारी नियुक्त करावे या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन छेडले. या आंदोलनात नगरसेवक दिपक बनगर, तानाजी विरकर,धनाजी पिसाळ, गणेश तुपे,दादा सरतापे, सोमनाथ कबीर, नितिन मेळावणे, संगिता केवटे, सुनिता खाडे, सल्लाऊद्दिन काझी, अशोक काळे नागरिक सहभागी झाले होते.

मोर्चा निघणार तेवढ्यात राजू शेट्टींना पोलिसांनी अडविले, मग काय घडले वाचा 

दरम्यान या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अधिग्रण केलेल्या जय भगवान हॉस्पिटलचे उदघाटन माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांत अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर, म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. आता या काेवीड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.