Satara News : सातारा जिल्ह्यासह कराड मध्येही बंदला प्रतिसाद

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक.
karad city close
karad city closesakal
Updated on

Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी जालना जिल्ह्यात लाठी हल्ला केला. त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कराडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्पर्तीने दुकाने व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला.

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोमवारी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे कालच त्याची माहिती माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यामुळे सांगलीत वातावरण निर्मिती झाली

ग्रामीण भागात जाणारी एसटी सेवा कराड आगारातून बंद ठेवण्यात आली आहे त्यामुळे तातडीच्या कामाला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी खाजगी वाहनाचा वापर केला. दरम्यान या जिल्हा बदला कराड शहरा सह तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. दुकानदार व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने व्यवसाय बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला. सकाळच्या टप्प्यात सर्व व्यवहार बंद राहिले.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.