भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार

भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार
Updated on
Summary

हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्याचा वेगळा आधार दिलासादायक ठरला आहे.

कऱ्हाड (सातारा): कोविडचे भूत डोक्यावर असतानाच पावसाने दाणादाण उडवली. महापुरात, भूस्खलनाच्या दुर्घटनेने जिल्हा हादरला. पाटण, वाईला भूस्खंलनाचे आभाळरूपी संकट आले. 31 लोक गाडली गेली. गावचे गावे दिशाहीन झाली. अशा काळात पालकमंत्री म्हणून बाळासाहेब पाटील यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. तेथील लोकांना धीर दिला. प्रशासनाच्या खांद्याला खांदा देत प्रंसगी त्यांच्याही पेक्षा दोन पावले पुढे टाकत पालकमंत्री पाटील यांनाही संकाटावर मात केली. त्यामुळे हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्याचा वेगळा आधार दिलासादायक ठरला आहे.

भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार
सातारा जिल्ह्यातील भूस्खलनाच्या सावटाखाली 50 गावे

जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना पालकमंत्री पाटील यांनी वेळ काळाचीही गय केली नाही. अत्यंत बिकट आंबेघर, मिरगाव, ढोकावळेसहीत ते वाईच्या दुर्घटानस्थळी वेळेत पोचून ग्रामास्थांना त्यांनी दिलेला आधारही महत्वाचा ठरला. कोरोना, महापुरासहीत भूस्खलनाच्या तीनही संकटात सापडलेल्या जिल्ह्याला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत खंबीरपणे सावरले. वेळेवर बैठकांचा आढावा, त्यात सुधारणापासून बारकावे त्यांनी टिपले.

भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार
'जरंडेश्वर'नंतर सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संवाद ठेवत पालकमंत्री नात्याने अनेक गोष्टी सुचविल्या. पहिल्या लाटेत पालकमंत्री पाटील यांना कोविडचा त्रास झाला. त्यातून बाहेर येत त्यांनी गणेशोत्सवात मंडळांनी सुचना केल्या. कऱ्हाड, सातारा, वाई, रहीमतपूर, मसूर, उंब्रज येथे मंडळांशी त्यानी थेट संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. दोन वर्षे कोरोनाशी लढा सुरू आहे, त्या काळात योग्य वेळेत निर्णय घेवून कोरोना रोखण्याचे प्रयत्न केले. स्थिती आजखेर कायम आहे. चार दिवसांपासून होणाऱ्या पाऊस व त्यामुळे आलेल्या आभाळरूपी संकटातही ते खंबीर आहेत. भूस्खलनाच्या घटना पाटण, वाई तालुक्यात घडल्या.

भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार
सातारा पालिकेतील टेंडर प्रक्रियेत 'गोलमाल'

पाटणला आंबेघर, मिरगाव, ढोकावळे येथील ३१ ग्रामस्थांचे संसार भूस्खलनात गाडले गेले. त्या घटनेने अस्वस्थ झालेले पालकमंत्री पाटील यांनी घटनेदिवशीच मिरगाव, ढोकावळे गाठले. तेथील पाहणी केली. त्याच दिवशी आंबेघरात पोचण्याचाही प्रय़त्न केला. तेथून ते थेट वाईला गेले. तेथील दुर्घटनासहीत पाचगणी, महाबळेश्वर भागातील खचलेल्या जमिनींची पाहणी केली. त्यातून पाल, तारळे भागतही आले. काल ते आंबेघरला पोचले. तेथे जाण्यास रस्ता थेट नव्हता. दोन किलोमीटर चालावे लागत होते. घसरट्या वाटेने आंबेघरात पालकमंत्री पाटील पोचले, तेथील स्थिती बघून त्यांनी पुढील आदेशही दिले. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांनी पालकत्वाचे नेतृत्वच सिद्ध केले.

भूस्खलनाने हादरलेल्या जिल्ह्याला पालकमंत्र्यांचा आधार
हद्दवाढीमुळे सातारा पालिकेच्‍या तिजोरीवर ताण, निधीअभावी विकास रखडला!

कडकसहीत तितकाच हळवेपणाही

दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी, उपायांसाठी अधिकाऱ्यांची बैठक, गरजेच्या भागात एनडीआरफची रवानगी अशा साऱ्यावर आपत्कालीन स्थितीत निर्णय घेताना पालक मंंत्री बाळासाहेब पाटील यांच्यातील कडकपणा दिसला. पाऊस ओसरल्याने काल ते आंबेघरला पोचले. तब्बल तीस फूट चिखलात गाडलेले आंबेघर पाहून ते गहीवरले, येथे त्यांचा हळवापणा दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.