पर्वतारोहण संघटनेच्या कार्यकारिणीत आशिष माने, सुनील भाटिया, ऍड. शार्दुल टोपेंचा समावेश

पर्वतारोहण संघटनेच्या कार्यकारिणीत आशिष माने, सुनील भाटिया, ऍड. शार्दुल टोपेंचा समावेश
Updated on

सातारा : निर्सग आणि पर्वतरागांविषयी कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी येथील अजिंक्‍यतारा किल्ला येथे आंतराष्ट्रीय पर्वत दिन 2020 चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त किल्ले अजिंक्‍यताऱ्याचे पूजन करण्यात आले. यासाठी कॉर्बेड फाउंडेशनचे विश्‍वस्त आणि नैनिताल राजघराण्याचे राजकुमार अक्षोभ सिंह उपस्थित होते.

या वेळी डॉ. संदीप श्रोत्री, रानवाटाचे मिलिंद हळंबे, जयंत देशपांडे, डॉ. झुंजार देशपांडे आदी उपस्थित होते. पर्वत पूजनानंतर अक्षोभ सिंह यांनी हिमालय आणि सह्याद्री पर्वत रागांमधील जैवविविधतेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. डॉ. श्रोत्री यांनी पर्वत ते नद्या यामधील जलचक्राची माहिती उपस्थितांना दिली. याचठिकाणी सातारा जिल्हा पर्वतारोहण संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

शेतकरी झाले हवालदिल ; कोकणात 70 एकर जमीन क्षारपड होण्याचा धोका 

या संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष माने यांची, तर उपाध्यक्षपदी सुनील भाटिया, सचिवपदी ऍड. शार्दुल टोपे, सहसचिवपदी रणधीर गायकवाड, खजिनदारपदी प्रवीण पाटील यांची, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिकेत पवार, कल्याण कदम, माधव प्रभुणे, कैलास बागल यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची आणि इतिहासाची निवड निर्माण करण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.