सातारा : सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये (Health Officer Dr. Aniruddha Athalye) हे रत्नागिरी या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर गेल्याने त्या ठिकाणचा प्रभारी कार्यभार दोन आठवड्यापासून डॉ. सचिन पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या काळात या पदावर पूर्णवेळ अधिकारी आवश्यक असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी (Satara District Health Officer) या रिक्त पदावर बीडचे आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार (Beed Health Officer Dr. Radhakrishna Pawar) यांची विशेष नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Satara District Will Get A Full Time Health Officer bam92)
गेल्या अडीच वर्षांपासून सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिरुद्ध आठल्ये कार्यरत होते. कोरोनाच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
गेल्या अडीच वर्षांपासून सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. अनिरुद्ध आठल्ये कार्यरत होते. कोरोनाच्या (Coronavirus) काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असतानाच त्यांची अचानक रत्नागिरी येथे प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. त्यामुळे या पदाचा पदभार प्रभारी कार्यभार डॉ. सचिन पाटील सांभाळत आहेत. ते ही अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. मात्र, राज्यभरातील जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत नसल्याने उपाययोजना राबविताना ठोस भूमिका घेण्यासाठी आरोग्य विभागाला काही प्रमाणात बंधने येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या नियुक्तीचे आदेश लवकरच निघणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, डॉ. राधाकृष्ण पवार हे २०११ बॅचचे अधिकारी असून, सुरवातीला बीड या ठिकाणी माता बाल संगोपन अधिकारी म्हणून त्यांनी काम केल्यानंतर त्यांची मुंबईला आरोग्य विभागात सहायक संचालक म्हणून बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी नंदुरबार व उस्मानाबाद या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविला आहे. बीडमध्ये कार्यरत असताना त्यांनी ऊसतोडणी कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याचे विशेष काम केले आहे, तसेच त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अतिशय प्रभावीपणे राबविली आहे.
बदलीसाठी विशेष आदेश?
सद्यःस्थितीत राज्यभरात जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) केडरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू नाही, तरी देखील सातारा जिल्हा कोरोनात हॉटस्पॉटवर असल्याने डॉ. पवार यांची साताऱ्याच्या जिल्हा परिषदेत डीएचओ म्हणून नियुक्तीसाठी विशेष आदेश होण्याची शक्यता आहे.
बीड येथे गेल्या पावणेचार वर्षांपासून मी कार्यरत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मला साताऱ्यात डीएचओ पदावर रुजू होण्याबाबतचे आदेश आल्यास तत्काळ हजर होणार आहे.
- डॉ. राधाकृष्ण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
Satara District Will Get A Full Time Health Officer bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.