दहिवडी (जि.सातारा) : एक जण कोरोना पॉझिटिव्ह सापडतो अन् सुरू होतो त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध. यात एक डॉक्टर सापडतो. दुर्दैवाने त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह येतो आणि सर्वत्र खळबळ माजते. एका डॉक्टरमुळे तब्बल 38 गावांच्या जिवाला घोर लागतो.
येथे एका प्रतीथयश डॉक्टरचे नामांकित रुग्णालय आहे. या डॉक्टरकडे तालुक्यातील अनेक गावांमधून रुग्ण येत असतात. असाच एक रुग्ण नरवणे येथून तपासणीसाठी आला होता. त्याच्यावर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले होते. रुग्णाला एका गुन्ह्यात ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील या डॉक्टरसह काही जणांना ताब्यात घेण्यात आले. दुर्दैवाने डॉक्टर व दोन तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. मात्र, त्यानंतर डॉक्टरच्या संपर्कातील व्यक्ती व रुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संपर्काची व्याप्ती लक्षात येताच प्रशासन चांगलेच हादरले. या डॉक्टरने 38 गावांतील 221 रुग्ण तपासले होते. एकट्या खुटबाव गावातील 35 जण संपर्कात आले होते. त्याचबरोबर घरातील 14 जणांशी डॉक्टरचा संपर्क आला होता. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 270 जण डॉक्टरच्या संपर्कात आले होते. आता हे 270 जण किती जणांच्या संपर्कात आले होते, याचा अंदाज लावणे अवघड आहे.
प्रशासनाने तातडीने हालचाली करून डॉक्टरच्या घरातील 14 जणांना दहिवडी येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले आहे. इतर 256 जणांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले असून, त्यांना शिक्के मारण्यात येणार आहेत. या सर्वांवर स्थानिक यंत्रणांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कोणालाही कसलाही त्रास जाणवल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण किती जणांना अडचणीत आणू शकतो, हे डॉक्टरच्या उदाहरणावरून दिसून आले. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या अथवा संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही कसलाही त्रास जाणवल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आता मोफत प्रसूती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
गरजले शंभूराज... प्रतिबंधित क्षेत्रात लोकांची गैरसोय नको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.