Satara : दुष्काळी भागाला मिळणार जादा दोन टीएमसी पाणी

सातारा, कोरेगाव, खटाव व माणमधील नऊ हजार हेक्टरला लाभ
devndra fadnvis
devndra fadnvis sakal
Updated on

मुंबई/ कोरेगाव - सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आज मान्यता दिली. जिल्ह्यातील दुष्काळप्रवण तसेच पाण्यापासून संपूर्णपणे वंचित राहिलेल्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून, मुख्यत्वे चार तालुक्यांतील नऊ हजार हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे.

यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे.दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाणी वाटपाचा फेरआढावा घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयातील कॅबिनेट हॉलमध्ये ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली होती.

यावेळी जलसंपदाचे मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, आमदार महेश शिंदे, जलसंपदाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदाचे विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ, उपसचिव प्रसाद नार्वेकर,तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता जयंत शिंदे व जिहे -कठापूर उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए. पी. निकम यांची उपस्थिती होती.

devndra fadnvis
Chh. Sambhaji Nagar : जिल्हा परिषदेच्या ४३२ पदांची ७ ऑक्टोबरला परीक्षा

"कोरेगाव तालुक्यातील भाटमवाडी, रामोशीवाडी, शेल्टी, खिरखिंडी, वाघजाईवाडी, भंडारमाची, बोधेवाडी, चिमणगाव, रुई, बोरजाईवाडी, आझादपूर, शेंदुरजणे, किन्हई, पेठ किन्हई, अनभुलेवाडी, जांब खुर्द, हिवरे, कवडेवाडी, बोधेवाडी, भाडळे, नागेवाडी, चिलेवाडी व हासेवाडी या गावांना चिलेवाडी तलावातून पाणी दिले जाणार आहे,

भाडळे धरणदेखील पाण्याने भरले जाईल. खटाव तालुक्यातील रणसिंगवाडी, वेटणे, राजापूर, मोळ, मांजरवाडी, डिस्कळ, चिंचणी, गारवडी, कातळगेवाडी, विसापूर, रेवलकरवाडी, जांब, जाखणगाव, खटाव, लोणी, आमलेवाडी, गादेवाडी, रामोशीवाडी आणि बिटलेवाडी या गावांना पाणी मिळणार आहे.

devndra fadnvis
M. S. Swaminathan: काय आहे स्वामिनाथन आयोग? शेतकऱ्यांचे आंदोलन झालं की आजही येतो चर्चेत

सातारा तालुक्यातील देगाव, निगडी तर्फ सातारा, वर्णे, राजेवाडी, देवकरवाडी आणि कारंडवाडी या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळी भाग सिंचनाखाली येणार असल्याने भाडळे खोऱ्यात गुलालाची उधळण करत आमदार महेश शिंदे यांची मिरवणूक काढण्यात आली.

devndra fadnvis
Satara News: सातार्‍यातील दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांची चिंता मिटली; देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास आमच्या सरकारने मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.