कोरोना इफेक्ट : दुबईला जाणाारी टरबूज, कलिंगडे आता गावच्या बाजारात; शेतकरी आर्थिक अडचणीत

कोरोना इफेक्ट : दुबईला जाणाारी टरबूज, कलिंगडे आता गावच्या बाजारात; शेतकरी आर्थिक अडचणीत
Updated on

आसू (जि.सातारा) : पवारवाडी (ता. फलटण) येथील एका जिद्दी तरुण शेतकऱ्याने इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम कलिंगड आणि टरबूजाचे उत्पादन घेण्याची किमया केली खरी. परंतु, अनपेक्षित कोरोना संकटातील लॉकडाउनमुळे दुबईला निर्यात केले जाणारे कलिंगड आणि टरबूज चक्क गावोगावच्या बाजारात विकण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे संजय वरे या जिद्दी शेतकऱ्याचे सारे गणितच बिघडवून टाकले असून, 15 लाखांचे नुकसान झाले आहे. किमान उत्पादन खर्च तरी मिळावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
 
त्यांनी गेली पाच महिन्यांत चक्क दोन वेळा कलिंगड आणि टरबूजाचे पीक घेण्याची संधी साधली. 21 जानेवारी ते 21 मार्च दरम्यान इस्त्राईल तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी 80 गुंठ्यात 8 वेगवेगळ्या जातीची कलिंगडे व टरबूजाची लागवड केली. या पहिल्या फेरीसाठी त्यांनी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, मार्चमध्ये पहिल्या फेरीतील ही फळे तोडणीस आली असताना कोरोनाचे संकटामुळे लॉकडाउन झाले आणि देशांतर्गत निर्यात बंद झाली. त्यामुळे रमजानची संधी साधत लक्ष्य केलेली दुबईची बाजारपेठ गाठता आली नाही. अशा स्थितीत निर्यातीची ही 60/65 टन फळे बांधावर विकावी लागली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. जूनमध्ये लॉकडाउन उठेल आणि किमान भांडवल तरी मिळावे, या उद्देशाने पुन्हा त्याच गादी वाफ्यावर त्यांनी 10 एप्रिल ते 4 जून दरम्यान दुसरी संधी घेत केवळ 55 दिवसांत जिद्दीने फळ विक्रीला आणले. मात्र, यावेळेसही घोर निराशा झाली. लॉकडाउन उठलाच नाही. बाजारपेठाही खुल्या झाल्या नाहीत. मग, ग्रामीण बरोबरच शहरी बाजारपेठाही लक्ष करून चौकाचौकांत ही फळे विकून दोन्ही फेरीतील किमान भांडवल मिळावे, यासाठी त्यांची सद्या धडपड सुरू आहे. वरून काळ्यापाटीचे आणि आतून पिवळे असणारे, तर दुसरे वरून पिवळे अन्‌ आतून लाल अशी आगळी वेगळी कलिंगडे विकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तब्बल 18 ते 20 किलो वजनाची 70 टक्के कलिंगडांचे भरघोस उत्पादन घेतले. मॉल्स आणि दुबईसाठी 35 रुपये किलो दर निश्‍चित झाला होता.
 
त्यातून सुमारे 15 लाख रुपयांचा फायदा झाला असता. परंतु, लॉकडाउनने घोर निराशा केली असली तरी गुंतवलेले भांडवल काढण्यासाठी त्यांचा शेवटचा प्रयत्न सुरू आहे. अडचणीत सापलेल्या शेतकऱ्यांची सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळिराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे. 



आठपैकी दोन जाती गिरीश कलिंगड, विशाला टरबूज दुबईला एक्‍स्पोर्ट करून बाकी सहा मॉल्सला देण्याचा विचार होता. कोरोनाच्या संकटात सरकार काहीतरी मार्ग काढेल, अशी आशा होती. मात्र, दुर्दैवाने सर्वकाही मातीमोल झाले. 
- सचिन वरे, शेतकरी, पवारवाडी. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()