Satara : फलटण पूर्व भागात रब्बीच्या पेरण्यांची लगबग

सोयाबीन, मका काढणी अंतिम टप्प्यात; वापशाअभावी उसाच्या लागणी होणारा उशिरा
Satara
Satara sakal
Updated on

तिरकवाडी : फलटण पूर्व भागात परतीच्या पावसाने रखडलेली खरीप हंगामातील सोयाबीन, मका काढणी अंतिम टप्प्यात आहे. तर शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरण्यांची लगबग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाऊस जास्त झाल्याने योग्य वापशाअभावी उसाच्या लागणीही उशिरा होणार असल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीनच्या काढणीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सलग दीड-दोन महिने पडत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक केली. मजुरांचा तुटवडा, अचानक येणारा पाऊस, यामुळे एका दिवसाच्या कामाला शेतकरी तीन-तीन दिवस शेतात राबत होते.

अनंत अडचणींतून शेतकऱ्यांनी पिके हातात घेण्याचा प्रयत्न केला. पावसाने उघडीप दिल्याने मका, सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. ज्या शेतकऱ्यांनी मका व सोयाबीनची उशिरा पेरणी केली आहे, ते पीक फक्त काढणीचे शिल्लक आहे. सोयाबीन, मूग, भुईमूग व इतर कडधान्यांची काढणी झालेल्या शेतात रब्बीच्या पेरण्या करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. रब्बी ज्वारी, हरभरा, करडई व मका पिकांची पेरणी करण्याची लगबग सुरू आहे. या आठवड्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण होतील.

अति पावसाने ऊस लागणीसाठी पूर्वमशागत करण्यासाठी योग्य वापसा नसल्याने लागणी रखडण्याची चिन्हे आहेत. एक महिना उशिरा उसाच्या लागणी होतील, अशी परिस्थिती आहे. रब्बी हंगामातील गहू पेरणीवरही त्याचा परिणाम होणार आहे. इतर बागायती पिकांच्या लागवडीसाठी पूर्वमशागत करण्यासाठी शेतात योग्य वापसा येण्यास अजून १५ दिवस लागतील, अशी चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.