गोंदवले (जि.सातारा) : मलाही ताई सारखंच अधिकारी व्हायचंय,' ही जिद्द अखेर प्रगतीने पूर्ण केली. पोलिस उपअधीक्षक असलेल्या बहिणीची "प्रेरणा' घेऊन "प्रगती' झाली नायब तहसीलदार अन् गोंदवलेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
गोंदवले बुद्रुकमधील सर्वसामान्य कुटुंबातील शिवाजी हवालदार नावाने सर्वपरिचित असणाऱ्या कुटुंबातील मुलींनी यश मिळवले आहे. जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, हेच या कुटुंबातील प्रेरणा आणि प्रगती या बहिणींनी दाखवून दिले आहे. गोंदवल्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा या दोघींनीही केला. प्रेरणा पोलिस उपअधीक्षक झाली. त्यामुळे धाकटी बहीण प्रगतीने मलाही असंच मोठं अधिकारी व्हायचंय, हे ठरवून अभ्यासाला लागली. गावातील नवचैतन्य हायस्कूलमधून माध्यमिक, तर दहिवडीच्या महात्मा गांधी विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. मुंबईतील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पदवी घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. मनी जिद्द असल्याने स्वयंअध्ययनावर जोर दिला. पुण्याच्या माऊली ग्रुपच्या माध्यमातूनही मार्गदर्शन मिळत गेले. अखेर 2019 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत प्रगती उतरली. या परीक्षेतूनच आज नायब तहसीलदारपदी तिची निवड झाली. कुटुंबीयांनी तिचे तोंड गोड करून हा आनंद साजरा केला.
प्रेरणा आणि प्रगतीच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटा भाऊ संग्रामही अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन अभ्यासाला लागला आहे. सध्या तोही एमपीएससीची तयारी करत आहे.
आम्ही भावंडांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, ही वडिलांची इच्छा होती. माझ्या पाठोपाठ प्रगतीनेही ही इच्छा पूर्ण केल्याने खूप आनंद होत आहे.
-प्रेरणा कट्टे, पोलिस उपअधीक्षक, कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.