Satara : कवठे पुणे सातारा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका या कोंडीतून धीम्या गतीने पुढे जात
वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहतूक कोंडी झाली आहे. sakal
Updated on

कवठे : पुणे सातारा महामार्गावर आज वाहनांची संख्या वाढल्याने सायंकाळी सहा वाजलेपासून मोठी कोंडी झाली. दिवाळीसाठी गावी आलेले नागरिक परत माघारी पुणे मुंबईच्या दिशेने निघाल्याने संपूर्ण महामार्ग जाम झाला. सुरवातीला

खंबाटकी बोगद्यापासून वेळे व नंतर हळूहळू वाहनांची गर्दी वाढून ती सुरूर, कवठे, बोपेगाव, अनवडी या गावांपर्यंत पोहचली. महामार्गावर भली मोठी रांग लागल्याने, अनेक वाहनचालकांनी आपली वाहने सेवरस्त्यावर घातल्याने सर्वत्रच मोठी कोंडी झाली. यामुळे रुग्णवाहिका जाण्यासाठी ही रस्ता राहिला नाही.

रात्री उशिरापर्यंत रुग्णवाहिका या कोंडीतून धीम्या गतीने पुढे जात होत्या. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासातील वृद्ध, आजारी तसेच लहान मुलांचे हाल होऊन त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. यातच काही गाड्या गरम झाल्याने बंद पडल्या. तर गर्दीमुळे अनेक ठिकाणी गाड्या घासून छोटेमोठे अपघात झाले. तसेच महामार्गावरील वाहने सेवरस्त्यावर आल्याने सेवरस्ता जाम झाल्याने स्थानिक नागरिकांनाही गावांत प्रवेश करताना खूप त्रास सहन करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()