जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी... या गीताला स्मरून अशीही मदत

Satara
Satara
Updated on

कवठे (जि. सातारा) : आसाममधील कुकरी कालापानी येथे 14 मार्च 2011 रोजी रात्रगस्त चालू असताना दहशतवाद्यांनी पुरून ठेवलेल्या भूसुरुंगाच्या साह्याने जवानांची गाडी उडवली होती. त्यामध्ये येथील जवान प्रवीण प्रताप डेरे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या बॅचमधील "बीएसएफ'चे सहकारी जवानांनी नुकतीच येथे भेट देवून हुतात्मा डेरे यांच्या कुटुंबास एक लाख रुपये मदत करून सन्मानही केला. 


हुतात्मा प्रवीण डेरे यांना वीरमरण आले होते. त्यावेळी डेरे हे 27 वर्षांचे होते. सहा वर्षे त्यांनी देशाची सेवा केली होती. प्रवीण यांनी लष्करात भरती होण्यासाठी जीवतोड मेहनत घेतलेली. अखेर "बीएसएफ'मध्ये भरती झाले. त्यांची घरची परिस्थिती ही अतिशय बेताचीच होती. ते दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे अकाली निधन आले. त्यांच्या आईने शेतीमध्ये कष्ट करून दोन मुली व प्रवीण यांना मोठ्या जिद्दीने व कष्टाने सांभाळ केला होता. हुतात्मा प्रवीण यांच्या सेवेची पाच वर्षे झाल्यानंतर विवाह झाला. 31 डिसेंबर 2010 रोजी प्रवीण यांना कन्यारत्न झाले. आपल्या गोंडस मुलीच्या बारशासाठी सुटीवर येण्यासाठी निघाले असतानाच आदल्या दिवशी स्फोटात त्यांना हौतात्म्य आले आणि त्या अडीच महिन्यांच्या मुलीचेही छत्र हरपले. ज्या वीरकन्येने आपल्या जन्मानंतर वडिलांचा चेहराही पाहिला नव्हता, ती पित्याच्या छत्राला मात्र कायमचीच पोरकी झाली. 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात 50 पेक्षाहून अधिक स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या व देश स्वतंत्र व्हावा यासाठी या लढ्यात कशाचीही पर्वा न करता आपल्या बायकामुलांसह सामील होणारे कवठे गाव. अगदी 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात कवठ्यातीलच वीर हुतात्मा पोलिस शिपाई अंबादास पवार हेही कवठ्याचेच सुपुत्र. अशा या शूर वीरांच्या भूमीतील 69 मराठा बॅचमधील सीमा सुरक्षा दलाचे हुतात्मा जवान प्रवीण डेरे यांच्या कुटुंबाला अल्पसा का होईना आधार देण्यासाठी व जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी... या गीताला स्मरून हुतात्मा डेरे यांच्या बॅचमधील "बीएसएफ'चे सहकारी व जवान नीलेश सोपान भुजबळ, अनिल गोरक्ष झरेकर यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने हुतात्मा जवान डेरे यांच्या परिवारासाठी एक लाख रुपयांचा निधी गोळा करून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे.

देशासाठी सैनिक व त्यांचा परिवार खूप मोठा त्याग करत असतात. या त्यागाची जाण आणि जाणीव आपल्या प्रत्येकाला असायला हवी तसेच ती प्रत्यक्ष कृतीतून करावी, या उदात्त हेतूने जवान अनिल झरेकर, नीलेश बरडे (अहमदनगर), विठ्ठल शिंदे, महेश पवार, प्रमोद यादव, समाधान शेलार (सातारा), बालाजी हजारे, नवनाथ पवार यांनी कवठे येथे वीरमाता रंजना, वीरपत्नी आश्विनी, वीरकन्या नूतन यांची भेट घेऊन मित्राच्या त्यागाची जाणीव ठेवली. या वेळी सरपंच श्रीकांत वीर, विशाल डेरे, बबनराव डेरे, अभिषेक यादव, अजित डेरे, श्रीकांत डेरे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()