कोविड हॉस्पिटलसाठी गृहमंत्र्यांची आठ दिवसांची डेडलाईन

patan
patan
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) ः पाटण तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचाराविना रुग्णांची हेळसांड आणि हयगय झालेली मला चालणार नाही. ढेबेवाडीत ऑक्‍सिजन बेडसह 35 खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरू करत आहोत. आठ दिवसांच्या आत ते कार्यान्वित झालेच पाहिजे, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी येथे दिल्या. 

येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू होत असलेल्या कोविड हॉस्पिटलच्या कामाची मंत्री देसाई यांनी पाहणी केली. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजाराम खंडागळे, विद्याधर शिंदे, सरपंच विजय विगावे, अमोल पाटील, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्री श्री. देसाई यांनी या वेळी हॉस्पिटलसाठी उपलब्ध अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय उपकरणे, औषधे, जेवणाची व्यवस्था, रुग्णवाहिका आदींबाबत तपशिलवार माहिती घेतली. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांसमवेतही त्यांनी मोबाईलवरून चर्चा केली. चॅलेंज समजून येथे सेवा बजवा. आला रुग्ण की लगेच पाठवा दुसऱ्या दवाखान्यात हे धोरण बदला. आलेल्या रुग्णांची व्यवस्थित तपासणी करून उपचार द्या, आदी सूचना मंत्री देसाई यांनी या वेळी दिल्या. 


जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढल्याने पुरेशा ऑक्‍सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा अजिबात जाणवणार नाही, यासाठी काळजी घेतली आहे. 

- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.