मसूर विभागात कोरोनाबाधितांची शंभरी पार, आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू

Satara
Satara
Updated on

मसूर (जि. सातारा) : विभागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज शंभरी पार केली. मसूर तीन, हणबरवाडी व अंतवडी प्रत्येकी दोन, शामगाव एक असा कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल आला आहे. आत्तापर्यंत मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 82, हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 20 रुग्णांचा समावेश आहे. त्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णांचा वाढता आलेख मोठा चिंताजनक असला तरी लोकांमध्ये अजूनही याबाबत गांभीर्यता नसल्याचे स्पष्ट दिसते. आरोग्य विभागासह पोलिस प्रशासनाने यंत्रणा राबवून ही लोकांच्या निष्काळजीपणामुळे यंत्रणेला हात टेकण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी राज्याचे साथरोग तज्ज्ञांनी मसूर व किवळला भेट दिली. 

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 23 गावे येतात. त्यात मुख्यतः शामगावला 27 कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. किवळ 18, मसूर 13, वडोली निळेश्वर 16 याप्रमाणे रुग्णांची वाढती संख्या आहे. चिखली, रिसवड, वाण्याचीवाडी, यादववाडी, हणबरवाडी, खराडे, कालगाव, कवठे, हेळगाव, पाडळी, कोपर्डे हवेली या ठिकाणीही रुग्ण सापडले आहेत. पुणे-मुंबईहून आलेल्या लोकांमुळे संसर्गातून बाधितांचा आकडा वाढत गेला.

आजपर्यंत तो वाढत आहे. बाधितांचा वाढता आलेख असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तितकेसे समाधानकारक आहे. मसूर आरोग्य केंद्रांतर्गत 82 रुग्ण आढळले असले तरी 50 बरे झाले आहेत. 29 रुग्ण उपचाराखाली आहेत. हेळगाव आरोग्य केंद्रांतर्गत 20 कोरोना रुग्णांची संख्या आहे. काल गावच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित बरे झाले आहेत. 

मसूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, हेळगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश देशमुख आणि त्यांच्या पथकाने कार्यक्षमपणे आवश्‍यक खबरदारी घेतल्यामुळे आणखी रुग्णसंख्या वाढली नाही. पोलिस प्रशासनाचे काम तत्परतेचे ठरले. आशा, अंगणवाडी सेविकांनी गावोगावी सर्व्हे करीत माहिती गोळा करून दिशादर्शक काम केले. त्यामुळे यंत्रणेला काम करणे सोयीचे ठरले. 

आरोग्य, पोलिस यंत्रणा कोरोना संसर्ग काळात कार्यक्षमपणे तत्परता दाखवत काम करताना लोकांनी कोरोनाबाबत काळजी घेतली नाही. मास्कविना फिरणे, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणे, खरेदीवेळी गर्दी करण्याबाबत दक्षता घेतली जात नाही. विभागात मसूर व हेळगाव आरोग्य केंद्रांतर्गत रुग्णांची संख्या 100 पर्यंत गेलेली आहे. या स्थितीची पाहणी करून माहिती घेण्यासाठी राज्याचे साथरोगतज्ज्ञ डॉ. आचरेकर, डॉ. चेतन सूर्यवंशी यांनी मसूर व किवळला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांसह आशा स्वयंसेविकांना मानसिक आधार देत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. बाधित रुग्णांच्या घराची पाहणीही केली. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.