डॉ. बापूजी साळुंखे यांना पद्म पुरस्कारासाठी प्रयत्न करेन : रामदास आठवले

Satara
Satara
Updated on

पाचगणी (जि. सातारा) : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि लाखो दिन दलित, बहुजणांना शिक्षण देऊन त्यांना ज्ञानसंपन्न केले. त्यांनी जे बहुमोल कार्य केले आहे, त्या कार्याचा गौरव केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन करावा, यासाठी मी केंद्र सरकारकडे प्रयत्नशील राहीन, असे उद्‌गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन महेता कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित "रिपब्लिकन पक्षाची वाटचाल' या विषयावरील राज्यस्तरीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ होते.

श्री. आठवले म्हणाले, ""उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी प्रथम मी दलित पॅंथर चळवळीत सक्रिय सहभागी झालो आणि महाराष्ट्रभर दलित अन्याय अत्याचाराविरोधात मोठ्या प्रमाणावर संघटन केले. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील तरुण नेहमीच माझ्याबरोबर राहिले. 1989 नंतर महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय बदलते चित्र पाहता मला राजकीय भूमिका घेणे गरजेचे वाटले. म्हणून सर्व दलित समाजातील लोकांना एकत्र करून दलित पॅंथर बरखास्त करून ऐक्‍यवादी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करून राजकीय भूमिका घेतली. गेली 30 ते 35 वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने काम करीत आहे.'' 

प्राचार्य डॉ. शेजवळ म्हणाले, ""डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी बहुजन समाजातील मुलांना ज्ञानार्थी बनविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांना सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मान करावा याकरिता डॉ. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षात आम्ही पाठपुरावा केला. मात्र, त्यास अद्याप यश आले नाही. रामदास आठवले यांनी आमची ही मागणी शासन दरबारी आग्रहाने मांडून डॉ. बापूजींना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.'' 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. तुकाराम राबाडे यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष निलाखे यांनी आभार मानले. वेबिनारच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. सुनील गुरव, प्रा. डॉ. अविनाश नलवडे यांनी सहकार्य केले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.