कऱ्हाड : वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर मशिनद्वारे कारवाई केली जात आहे. मात्र, नागरिकांकडून तो दंड भरला जात नसल्याचे वास्तव आहे. तीन वर्षांत एक लाख ८४ हजार ९३९ नागरिकांना तब्बल दोन कोटी ८० लाखांचा दंड झाला आहे. अद्यापही त्यांनी तो भरलाच नाही. त्यामुळे कोट्यवधींची रक्कम वसुलीविना थकीत आहे.