Satara News: कऱ्हाडला स्वाभिमानी संघटनेचा चक्काजाम; पाचवड फाटा येथे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली
Satara News
Satara Newssakal
Updated on

Satara News : शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे... कोण म्हणतो देत न्हाय.., घेतल्याशिवाय रहात न्हाय..., शासनाकडुन थकलेले अनुदान मिळालेच पाहिजे..., वीज कनेक्शन तोडु नये आदी घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पाचवड फाटा (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथे चक्काजाम आंदोलन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष बापुराव साळुंखे, तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील यांनी थकीत वीज बिलापोटी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचं सत्र राज्य सरकारनं चालवलं आहे. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही.

बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, ऊस उत्पादन आणि साखर कारखाने आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे; पण तोडणी मजुरांची संख्या मात्र कमी होत आहे.

याचा फायदा घेऊन तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, सदोष वीजबिल दुरुस्त करून द्यावी, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित ३७ टक्के वीज वाढ रद्द करावी या साठी आंदोलन कऱण्यात आले.

दरम्यान आंदोनावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता रविंद्र बुंदेले, अधिकारी श्री. जाधव यांनी आंदोलनस्थळी जावुन निवेदन स्विराकले. दरम्यान आंदोलनस्थळी कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Satara News
Hindu Marriage Rituals : हिंदू विवाहाच्या वेळी वधू वराच्या डाव्या बाजूलाच का बसते? जाणून घ्या खरं कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.