सातारा : ‘किसन वीर’ला जास्तीतजास्त मदत देणार ; उपमुख्यमंत्री पवार

मुंबईत संचालकांसोबत बैठक, शेतकरी, कामगारांची थकीत देणी भागवणार
उपमुख्यमंत्री पवार
उपमुख्यमंत्री पवारsakal
Updated on

सातारा : किसन वीर साखर कारखान्याला कर्जातून मुक्त करतानाच शेतकरी व कामगारांची देणी देऊन पुढील वर्षी हंगाम यशस्वीपणे सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक पावले टाकली आहेत. राज्य सरकारकडून कारखान्याला जास्तीतजास्त मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी नूतन संचालक मंडळाला दिली.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालकांची काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त शेखर गायकवाड, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, किसन वीरचे एमडी श्री. शिंदे यांच्यासह संचालक उपस्थित होते. बैठकीत नितीन पाटील यांनी किसन वीर कारखान्यावरील कर्जाची नेमकी माहिती श्री. पवार यांच्यापुढे मांडली. शेतकरी व कामगारांची देणी, बँकांची देणी याचीही माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीत कारखान्याची अवस्था काय आहे, हेही त्यांनी अजितदादांच्या निदर्शनास आणून दिले. आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील व संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अजित पवार यांनी किसन वीर साखर कारखान्याला राज्य शासनाकडून सर्व ती मदत करण्याची ग्वाही दिली.

कामगार व शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, हेही सांगितले, तसेच कारखान्याचा हंगाम सुरू करताना काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी संचालक मंडळाला केली. कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व स्तरांतून मदत कशी मिळवून देता येईल, याविषयीही माहिती दिली. त्यामुळे किसन वीर कारखान्याला मदत करण्यासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना आल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यापुढे अधिक जलद गतीने घेतले जातील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()