अखेर आलाच ताे... कोयनानगर राहणार कडकडीत बंद

कोरोना
कोरोना
Updated on

कोयनानगर (जि. सातारा) : कोयनानगरच्या दोन्ही बाजारपेठेत आतापर्यंत तीन रुग्ण सापडले आहेत. प्रशासनाने खालच्या मार्केटमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करूनही दुकाने सुरू ठेवणाऱ्या व बिनधास्त कोयनावासीयांनी आता कोरोनाचा धसका घेतला आहे. 

बाधिताच्या निकट सहवासात आलेल्या सहा जणांमुळे कोयनावासीय हादरून गेले आहेत. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पुढाकार घेऊन सर्व व्यापारी वर्गाची कोयनानगर येथे बैठक घेतली. 

कोयनानगरमध्ये शासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केल्यामुळे केवळ अत्यावश्‍यक सेवा देणारी दुकाने उघडी राहतील. तसेच जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा सुरू करण्यासंदर्भात सूचनाही केल्या आहेत. 

प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या नियमांद्वारे सर्वांनी कोयनानगरला कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करावा, असे आवाहन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला सर्व व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.