Satara: "जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करा"

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी सभासद नोंदणी अभियान राबविणार अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी अंनिसच्या कामकाजाबाबत माहिती दिली. या वेळी साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, दीपक गिरमे, दीपक माने, वंदना माने, प्रकाश खटावकर,
 law  Maharashtra ANS
law Maharashtra ANSSakal
Updated on

सातारा - जादूटोणाविरोधी कायद्यास ऑगस्ट २०२३ मध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राज्यव्यापी कायदा प्रबोधन यात्रा काढण्यात येईल,

तसेच देशभर हा कायदा लागू व्हावा, यासाठी ‘कायदा मागणी राष्ट्रीय परिषद’ घेणार असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीमध्ये घोषित करण्यात आले.

दरम्यान, मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत संघटना बांधणीसाठी अंनिसची राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान राबविणार असून, राज्यभरात पाच हजार सभासद करण्याचे उद्दिष्ट राज्य कार्यकारिणीने घेतले आहे.

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणमध्ये नुकतीच महाराष्ट्र अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. बैठकीस राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.

 law  Maharashtra ANS
Mumbai : साखरपुड्याचे फटाके फुटले अन् गावात लागली आग; वाहने जळून खाक, Video

अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी अंनिसच्या कामकाजाबाबत माहिती दिली. या वेळी साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, दीपक गिरमे, दीपक माने, वंदना माने, प्रकाश खटावकर,

मोहसीन शेख, शंकर कणसे, हौसेराव धुमाळ, विलास भांदिर्गे, भगवान रणदिवे, बाळ देवधर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील १० पुस्तिकांची निर्मिती सहा महिन्यांत केली जाणार असून,

 law  Maharashtra ANS
Mumbai: आयपीएस अधिकारी सुधीर हिरेमठ यांची सीबीआयमध्ये वर्णी

यामधील पाच पुस्तिका डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या राहणार आहेत, तसेच अंनिसच्या मानसमित्र प्रकल्पांतर्गत ‘भावनिक प्रथमोपचार’ यावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.’’

प्रा. बांदेकर म्हणाले, ‘‘विवेकी विचार नष्ट करणाऱ्या संघटित शक्तींचा प्रतिकार करणे आवश्‍यक आहे. मनुष्यामध्ये अंधश्रद्धा ही जन्मजात नसून ती त्या व्यक्तीवर समाजामार्फत लादली गेल्याने ती आपणच दूर करू शकतो.

विवेकी विचार नष्ट करण्याचे संघटित प्रयत्न जोमात सुरू असून, त्या शक्तीचा प्रतिकार केला पाहिजे.’’

साताऱ्यात जुलैमध्ये समारोप

प्रा. डॉ. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियानाचे वर्षभरात एक हजार कार्यक्रम कार्यकर्त्यांनी केले आहेत.

या अभियानाचा समारोप परिषद सातारा येथे जुलै २०२३ मध्ये आयोजित करणार असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.;

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.