सातारा : डोंगरातील वाटेवरच बिबट्याचा मुक्काम; शेतकरी चिंतेत

डोंगरात चरायला सोडलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच तेथे घडली.
डोंगरातील वाटेवरच बिबट्याचा मुक्काम; शेतकरी चिंतेत
डोंगरातील वाटेवरच बिबट्याचा मुक्काम; शेतकरी चिंतेतSakal
Updated on

ढेबेवाडी : ज्या ठिकाणी शेतकरी दररोज जनावरे चरण्यास सोडतात, तो महिंद धरणाच्या काठावरील सळवे (ता.पाटण) नजीकचा डोंगर बिबट्याच्या मुक्कामामुळे असुरक्षित बनला आहे. शेळी व वासराचा फडशा पाडणारा बिबट्या तेथील युवकांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण असून वन विभागाने तातडीने त्या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणीही होत आहे.

महिंद धरणाच्या काठावरील महिंद व सळवे गावांच्या परिसरात जंगलक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून अन्य वन्य श्वापदांसह बिबट्याचा उपद्रवही वाढत चालल्याने शेतकरी व ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे.आतापर्यंत ता परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गावाजवळच्या डोंगरातच बिबट्याचा मुक्काम असल्याने डोंगरात नित्य जनावरे चरण्यास नेणाऱ्या शेतकऱ्यांतून काळजीचा सूर उमटत आहे. यादववाडी (सळवे) येथील खाशाबा यादव यांनी डोंगरात चरायला सोडलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच तेथे घडली.

डोंगरातील वाटेवरच बिबट्याचा मुक्काम; शेतकरी चिंतेत
Omicron : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCRचे प्री-बुकिंग अनिवार्य

श्री.यादव यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याच्या तावडीतून शेळीची सुटका केली. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मृत शेळीला तेथेच टाकून बिबट्या तेथून निघून गेला. त्यावेळी तेथे फिरायला आलेल्या सचिन कुंभार व अभिजित कुंभार या युवकांना श्री.यादव यांनी हा प्रकार सांगितल्यावर तो बिबट्याच असल्याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी जवळच्याच ऐनाच्या झाडाला व्हिडिओ कॅमेरा ऑन करून मोबाईल बांधून ठेवला. तेथून ते सर्वजण दूर निघून गेल्यावर मृत शेळीला नेण्यासाठी पुन्हा तेथे आलेला व शेळीला फरफटत घेऊन निघालेला बिबट्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

साधारणपणे ४४ मिनिटांचा व्हिडिओ चाळताना ही बाब समोर आल्याचे संबंधित युवकांनी सांगितले. दरम्यान, तेथीलच दत्तात्रय कदम यांच्या मालकीचे वासरूही बिबट्याने फस्त केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम, राहुल शेडगे, सागर पवार व ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने आवश्यक पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा. पिंजरा बसविण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

डोंगरातील वाटेवरच बिबट्याचा मुक्काम; शेतकरी चिंतेत
निलेश राणे शरद पवारांना टोला लगावण्याच्या नादात विसरले फॅक्ट

''शेतकरी आणि त्यांच्या पाळीव जनावरांच्या नित्य ये-जा करण्याच्या मार्गावरच बिबट्या मुक्कामी असल्याने वन विभागाने तत्काळ पावले उचलून सुरक्षितता देण्याची गरज आहे.''

- गणेश कदम, ग्रामस्थ, सळवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.