साताऱ्यात लॉकडाउन भंगचा उद्या 'ऑन दि स्‍पॉट' फैसला!

Lockdown
Lockdownesakal
Updated on

सातारा : लॉकडाउन (Lockdown), अनलॉक प्रक्रियेदरम्‍यान विविध कारणास्‍तव जिल्ह्यातील अनेक व्‍यापारी तसेच इतरांवर नियमभंगाचे गुन्‍हे विविध पोलिस ठाण्‍यांमध्‍ये (Police Station) दाखल झाले होते. या गुन्ह्यांतील तांत्रिक, कायदेविषयक बाबींमुळे लॉकडाउननंतर व्‍यापाऱ्यां‍ना ‘लॉकअप’ची भीती लागून राहिली होती. या भीतीतून त्‍यांची सुटका होण्‍याचा मार्ग लोकअदालतीमुळे मोकळा होणार आहे. असे सुमारे तीन हजारांहून अधिक गुन्‍हे पोलिसांनी रविवारच्‍या (ता. एक ऑगस्‍ट) लोकअदालतीत पाठवले आहेत. यास प्रतिसाद दिल्‍यास व्‍यापारी तसेच इतरांवरील गुन्ह्यांचा फैसला ‘ऑन दि स्‍पॉट’ होण्‍यास मदत होणार आहे. (Satara Lockdown Police Took Action Against Civilians In The Corona Lockdown bam92)

Summary

लॉकडाउन काळात नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला होता.

कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी केंद्र शासनाने गतवर्षी लॉकडाउन जाहीर केले होते. लॉकडाउन काळात नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला होता. पहिल्‍यांदा सौम्‍य कारवाई करत पोलिसांकडून संबंधित व्‍यापारी तसेच नागरिकांना समज देण्‍यात येत होती. समज देऊनही कार्यपध्‍दतीत बदल न करणाऱ्यांवर नंतरच्‍या काळात पोलिसांनी आपत्ती व्‍यवस्‍थापन तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार गुन्‍हे दाखल केले. लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रियेतही अशाच प्रकारे नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले. गुन्‍हे दाखल झाल्‍याने काही अंशी व्‍यापारीपेठेतील दैनंदिन कामकाजात सुसुत्रता आली होती.

Lockdown
मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंनी तोंड सांभाळून बोलावं

दाखल गुन्ह्यांत दंड आणि कारावासाच्‍या शिक्षा होण्‍याची भीती असल्‍यामुळे अनलॉकनंतर व्‍यापारी तसेच गुन्‍हा दाखल असणाऱ्या या सर्वसामान्‍यांना लॉकअपची भीती लागून राहिली होती. यामुळे अनेकांनी दाखल गुन्‍हे, त्‍यातील तरतुदी, त्‍यातून सुटका होण्‍यासाठीच्‍या कायदेविषयक वाटाघाटी वकिलांच्‍या मदतीने सुरू केलेल्‍या होत्‍या. या वाटाघाटी सुरू असल्‍या तरी पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्‍याच्‍या बजावण्‍यात येणाऱ्या या नोटिसा, त्‍या ठिकाणी होणारी चौकशी, दंड आणि कारावास आदी चर्चांमुळे सर्वसामान्‍यांच्‍या तोंडचे पाणी पळत होते. लॉकडाउनमुळे बिघडलेले अर्थकारणाने ग्रासलेल्‍यांच्‍या काळजीत या गुन्ह्यां‍मुळे आणखीनच भर पडली होती. त्‍यांची काळजी दूर करण्‍यासाठी विविध पोलिस ठाण्यांत दाखल असणारे अशा प्रकारचे सुमारे तीन हजारांहून अधिक गुन्‍हे पोलिसांनी रविवारी (ता. एक ऑगस्‍ट) येथे होणाऱ्या राष्‍ट्रीय लोकअदालतीत निकाली काढण्‍याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी गुन्‍हे दाखल असणाऱ्यांना त्‍या ठिकाणी उपस्‍थित राहण्‍याच्‍या नोटिसा प्राधिकरणामार्फत पोलिसांनी बजावल्‍या आहेत.

Lockdown
'वीज वितरण'ची 13 कोटींची हानी; अतिवृष्टीत 11 हजार पडले खांब!

इतरही प्रकरणांवरही सुनावणी

दरम्यान, या लोकअदालतीत भूसंपादन प्रकरणे, धनादेश न वटलेली प्रकरणे, फीसंबंधी प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे इत्यादी सर्व प्रकरणांवरदेखील सुनावणी होणार आहे. या प्रकरणांत तडजोड घडवून आणण्‍यासाठी न्यायाधीश, सरकारी वकील मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.

ऑनलाइन पध्‍दतीने सहभागी होता येणार

लोकअदालतीसाठी प्राधिकरणाने कोरोना प्रादुर्भावामुळे पक्षकारांना व्यक्तिश: उपस्थित राहण्‍यास मनाई केली आहे. ज्‍यांना या लोकअदालतीत सहभागी होऊन तडजोड करावयाची इच्‍छा आहे, त्‍यांना यात ऑनलाइन पध्‍दतीने सहभागी होता येणार आहे. या लोकअदालतीत होणाऱ्यांनी तडजोडीची मानसिकता बाळगल्‍यास मतभेद दूर होऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्‍यास मदत होणार आहे.

Satara Lockdown Police Took Action Against Civilians In The Corona Lockdown bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.