Satara Lok Sabha 2024: लढत दोन्ही ‘राष्ट्रवादी’तच? तीन मतदारसंघ ठरवतात साताऱ्याचं भवितव्य! लोकसभेची तथ्यचित्रे

Satara Lok Sabha 2024: सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. आजपर्यंत कराडचे दोन (दक्षिण व उत्तर) आणि पाटण हे तीन मतदारसंघच सातारा लोकसभेचा खासदार ठरवितात, असा अनुभव आहे.
Satara Lok Sabha 2024
Satara Lok Sabha 2024Esakal
Updated on

सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. आजपर्यंत कराडचे दोन (दक्षिण व उत्तर) आणि पाटण हे तीन मतदारसंघच सातारा लोकसभेचा खासदार ठरवितात, असा अनुभव आहे. येथून जो उमेदवार सव्वा लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्य घेतो तोच सातारा लोकसभेवर निवडून येतो. हा आजपर्यंतचा पायंडा आहे. लढत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांत होणार की भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी होणार हा कळीचा मुद्दा आहे. अद्याप महायुती आणि मविआचे उमेदवार निश्चित झालेले नसल्यामुळे राजकीय संभ्रमावस्था कायम आहे.

२०१९चे चित्र

श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी

मते : ६,३६,६२०

उदयनराजे भोसले (भारतीय जनता पक्ष)

मते : ५,४८,९०३

सुशीलकुमार भोसेकर (अपक्ष)

मते : २६,४०७

चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी)

मते : १७,२०३

विजयी उमेदवारांचे मताधिक्य: ८७,७१७

Satara Lok Sabha 2024
Loksabha Election 2024: उमेदवारांसाठी होत्या रंगीत मतपेट्या! वाचा भारतातील निवडणुकांचे रंजक किस्से

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : राष्ट्रवादी

२०१४ : राष्ट्रवादी

२०१९ : राष्ट्रवादी

Satara Lok Sabha 2024
Thane Lok Sabha: शिंदेंच्या अस्तित्त्वाची लढाई, ठाण्यात हा मुद्दा गाजणार! लोकसभेची तथ्यचित्रे

सद्य:स्थिती

महायुतीकडून उदयनराजे भोसले इच्छुक

‘मविआ’चा उमेदवार अद्याप निश्चित नाही

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नितीन पाटील इच्छुक आहेत

भाजपने उदयनराजेंना उमेदवारी दिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काही मते शरद पवारांच्या उमेदवाराकडे जाण्याची शक्यता

शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ने कराड भागातील उमेदवार दिल्यास सातारा, वाई भागातील उमेदवाराला निवडणूक अडचणीची ठरणार

हे प्रभावी मुद्दे

मराठा आरक्षणाचा मुद्दा

औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग आलेले नाहीत

बेरोजगार युवकांना पुणे, मुंबईची वाट धरावी लागते

दुष्काळी परिस्थितीकडे शासन व प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.