Satara : कारंजामुळे खुलणार मंगळवार तळ्याचे सौंदर्य

वसंत लेवेंचा पुढाकार; २५ फुटांपर्यंत उडणार पाण्याचे तुषार
satara
satarasakal
Updated on

सातारा : शहराच्‍या मध्‍यवर्ती भागात असणाऱ्या मंगळवार तळ्याचा कायापालट करण्‍यासाठी माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढाकार घेतला आहे. सातत्‍यपूर्ण उपक्रमांमुळे तळ्याची दुरवस्‍था दूर होण्‍याबरोबरच त्‍या ठिकाणची पाणीपातळी सततच्‍या पावसामुळे वाढली आहे. या तळ्याच्‍या मध्‍यस्‍थानी येत्‍या काही दिवसांत २५ फूट उंच तुषार उडविणारे पाण्‍यावरील तरंगते कारंजे बसविण्‍यात येणार आहे.

मध्‍यवर्ती भागात असणाऱ्या मंगळवार तळ्यात यापूर्वी शहरातील सार्वजनिक गणेश आणि दुर्गा मंडळांच्‍या मूर्तींचे विसर्जन करण्‍यात येत होते. या विसर्जनानंतर या परिसरात मोठी दुर्गंधी पसरत होती. दरवर्षी होणाऱ्या या त्रासामुळे त्‍याविरोधात काही जणांनी न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावले. यानंतर न्‍यायालयाने याठिकाणच्‍या विसर्जनावर बंदी घातली. बंदीनंतर शहरातील सार्वजनिक गणेश आणि दुर्गामूर्तींच्‍या विसर्जनासाठी पालिकेच्‍या वतीने कृत्रिम तलाव खोदण्‍यात आले. विसर्जन बंद झाल्‍यानंतर या तळ्यांचा विकास करण्‍याचा निर्णय त्‍या भागातील काही संस्‍था, माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी घेतला. यानुसार तळ्याच्‍या भिंतींवर वाढलेली झुडुपे तोडत आतील कचरा, गाळ उपसण्‍यात आला.

तळ्यातील पाण्‍यातील प्राणवायूची पातळी कायम राखली जावी, यासाठी नंतर पाणी उपसून पुन्‍हा त्‍याच तळ्यात सोडण्‍याचे काम श्री. लेवे यांनी हाती घेतले. याचदरम्‍यान संपूर्ण तळ्याचा परिसरात चेनलिंकच्‍या जाळ्या तसेच प्रवेशव्‍दार बसवून बंदिस्‍त केले. तळ्यात कचरा, निर्माल्‍य टाकण्‍याचे थांबल्‍याने सध्‍या त्‍याठिकाणी नितळ पाण्‍याचा मोठा साठा झाला आहे. सततच्‍या पावसाने येथील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे.

या पाण्‍याची शुध्‍दता कायम राहावी, सौंदर्य वाढावे, यासाठी या तळ्याच्‍या मध्‍यभागी तरंगते कारंजे बसविण्‍याचा निर्णय श्री. लेवे यांनी घेतला आहे. यासाठीची प्रक्रिया त्‍यांनी पूर्ण केली आहे. सुमारे ४ लाखांचा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे. श्री. लेवे यांनी त्यासाठी कोणाकडून कोणत्‍याही मदतीची अपेक्षा धरलेली नाही. येत्‍या काही दिवसांत या कारंजासाठीची मोटार व इतर साहित्‍य त्‍याठिकाणी आणून त्‍याची चाचणी घेण्‍यात येणार आहे. कारंजामुळे तळ्याच्‍या सौंदर्यात वाढ होणार आहे.

तळ्याचा कायापालट करण्‍याचा निर्णय घेत आम्‍ही पुढाकाराने त्‍यासाठीचे काम सुरू केले. एकेक एक काम पूर्ण करत तळ्याचे रुपडे पालटविण्‍यात येत असून यामुळे नागरिकांच्‍यात समाधानाचे वातावरण आहे. येत्‍या काही दिवसांत २५ फूट उंच तुषार उडविणारे तरंगते कारंजे येथे उभारण्‍यात येणार आहेत.

- वसंत लेवे, माजी नगरसेवक, सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()