सातारा : सातारा (satara) शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात आजही (साेमवार) पावसाची (rain) संततधार सुरु आहे. आज सकाळी आठ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर (mahableshwar), तापाेळा (tapola) भागात जादा पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विशेषतः कराड (karad), पाटण (patan) तालुक्यातील ग्रामीण भागात घरांची पडझड झाली आहे. (satara marathi news 24 hours rainfall mahableshwar tapola panchgani)
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 83.8 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. याबराेबरच पाचगणी 55.8, तापाेळा 110.9 , लामज 128.3, मेढा 15.1, केळघर 15.4, बामणाेली 61.0, करहर 56.6, कुडाळ 18.2, आनेवाडी 28.2, पसरणी 16, पाचवड 27, धाेम 15, वाई 16, भुईंज 28, आेझर्डे 17, सुरुर 8, खटाव 4, आैंध 14.80, पुसेगाव 5.20, बुध 3.10, वडूज 3.40, पुसेसावळी 13.20, मायणी 4.00, निमसाेड 2.40, कातरखटाव 2.20 मिलीमीटर इतकी पावसाची नाेंद झाली आहे.
याबराेबरच सातारा तालुक्यातील सातारा 27, खेड 25 , वर्ये 20 , कण्हेर 21, शेंद्रे 16.20, नागठाणे 28, आंबवडे 36, दहीवड 8, वडूथ 12, तासगाव 0.00, अपशिंगे 28.00, पाटण तालुक्यातील कुठरे 51 , तळमावले 22, मल्हारपेठ 25, तारळे 27 , चाफळ 46, ढेबेवाडी 32 , पाटण 50 , म्हावशी 49, हेळवाक 20 , मरळी 42 , माेरगीरी 30 मिलीमीटर पावसाची नाेंद झालेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.