धरणग्रस्तांची चौथी पिढी आंदोलनात सक्रिय; अन्नत्यागास प्रारंभ

सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा जे काम आता सुरू आहे ते काम म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खाताय अश्या पद्धतीने सुरू त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेचं विलंब होत आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
koyna projected affected citizens
koyna projected affected citizenssystem
Updated on
Summary

सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा जे काम आता सुरू आहे ते काम म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खाताय अश्या पद्धतीने सुरू त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेचं विलंब होत आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे

सातारा : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलन तीव्र करण्यात आले. आज (साेमवार) आंदाेलनाच्या आठव्या दिवशी एक वेळ अन्नत्याग करुन आंदोलनग्रस्तांनी पुढचा टप्पा सुरू केला आहे. satara-marathi-news-bharat-patankar-koyna-dam-project-affected-citizens-protests-ajit-pawar

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सह्याद्री अतिथीगृह येथील निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आंदोलनाचा आज (साेमवार) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील साडेपाच हजार कुटुंब खातेदार व त्यांचे कुटुंबीय असे एकूण पंचवीस हजार ते सव्वीस हजार लोक सहभागी झाले आहेत.

koyna projected affected citizens
काेविडसह म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी 'सिव्हील' सज्ज

कोयनेचे प्रश्न हे सातारा जिल्ह्यातील अधिकारीच लांबवत आहेत त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गावागावात एक वेळचे अन्नत्याग करून आपल्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही लढाई निकरीने व प्रत्यक्षात अंबलबजावणी प्रारंभ न झाल्यास आरपारची लढू असा इशारा कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त जनतेने दिला आहे.

वेळ पडल्यास अधिक आंदोलन तीव्र करून होणाऱ्या परिणामास सातारा जिल्ह्याचे प्रशासन व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात सातारा, सांगली जिल्ह्यातील लोक सहभागी असून श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्यासह हरीचंद्र दळवी, हे कार्यकर्ते या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचा जे काम आता सुरू आहे ते काम म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खाताय अश्या पद्धतीने सुरू त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळेचं विलंब होत आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.