लस येताच सिव्हीलला नागरिकांची धाव; कोव्हॅक्‍सिन अत्यल्प

जिल्ह्यात रविवारी उपलब्ध झालेल्या लशीचे वाटप पहाटेपर्यंत लसीकरण केंद्रांना केले जाणार आहे. उपलब्ध 26 हजार 910 लशींपैकी 45 वर्षांपुढील नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड 17 हजार 200 लशींचे डोस, तर कोव्हॅक्‍सिनचे 1 हजार 10 डोस, 18 ते 44 वयोगटासाठी आठ हजार 700 कोव्हिशिल्डचे डोस उपलब्ध झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
coronavirus vaccine
coronavirus vaccinesystem
Updated on

सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण मोहीमही (vaccination drive) गतीने सुरू होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील काही केंद्रांवरील लशीचा साठा संपल्याने लसीकरण बंद होते. परंतु, रविवारी रात्रीच्या सुमारास 26 हजार 910 डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण पूर्ववत सुरू असल्याची माहिती लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितली. (satara marathi news coronavirus vaccination center covaxin shortage)

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. यामध्ये सुरुवातीला लसीकरण सत्रांची संख्या 350 च्या पुढे होती. मात्र, सध्या काही ठिकाणी लशीचा तुटवडा जाणवत असल्याने जिल्ह्यात सुमारे 150 लसीकरण सत्रांची संख्या ठेवण्यात आली आहे. तसेच, दररोज लसीकरणाचे उद्दिष्ट 20 हजार ठेवण्यात आले असून, नागरिकांचाही लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रांवर लशीचा साठा संपला होता. मात्र, लस उपलब्ध झाल्याने लसीकरणास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जादा लशीची मागणी केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

coronavirus vaccine
Mothers Day Special : आईसाहेब माझी पाॅवर बॅंक : उदयनराजे

...अशी होणार लशीची विभागणी

जिल्ह्यात रविवारी उपलब्ध झालेल्या लशीचे वाटप पहाटेपर्यंत लसीकरण केंद्रांना केले जाणार आहे. उपलब्ध 26 हजार 910 लशींपैकी 45 वर्षांपुढील नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड 17 हजार 200 लशींचे डोस, तर कोव्हॅक्‍सिनचे 1 हजार 10 डोस, 18 ते 44 वयोगटासाठी आठ हजार 700 कोव्हिशिल्डचे डोस उपलब्ध झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

लसीकरण अपडेट

पहिला डोस : 5,61,609

दुसरा डोस : 84,005

एकूण लसीकरण : 6,45,614

रविवारीचे लसीकरण : 2,149 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

coronavirus vaccine
सातारा : 'रेमडेसिव्हर' 35 हजारांना विकताना वाॅर्डबाॅयला अटक

आज (साेमवार) सकाळपासून जिल्हा रुग्णालय, गाेडाेली तसेच कस्तुरबा रुग्णालय या तिन्ही ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी झाली हाेती. जिल्हा रुग्णालयात 18 ते 44 वयाेगटातील नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती आराेग्य विभागातून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.