भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना उदयनराजेंनी भुलवले : नगरसेवक अशोक मोने

भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना उदयनराजेंनी भुलवले : नगरसेवक अशोक मोने
Updated on

सातारा : सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय, सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष म्हणून बसवतोय असे सांगून पालिकेची निवडणूक लढवत सत्ता मिळवली. सत्ता मिळाल्यानंतर सत्ताधारी नगरसेवक फक्त टेंडर, टक्केवारी आणि पैसे कमावण्यात गुंतल्याचे प्रकरण त्यांचेच नगरसेवक वसंत लेवे, नगराध्यक्षा माधवी कदम यांनीच उघड केल्याची टीका करत नगरसेवक अशोक मोने यांनी सातारा विकास आघाडीच्या कारभारावर निशाणा साधला. 

मोने यांच्या पत्रकात म्हटले आहे, की सातारा पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये टेंडर आणि टक्केवारीसाठी कळवंडी लागत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पालिकेतील भ्रष्टाचार सत्ताधारी नगरसेवकांनीच जनतेसमोर आणला. याबद्दल त्यांचे सातारकरांच्या वतीने मी अभिनंदन करतो. लेवे, कदम यांनी टीका करत त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाढे वाचले. साविआत टेंडर, टक्केवारीसाठी गळे धरण्याचे प्रकार नवीन नाहीत. सभेतील आरोपांना उत्तर देण्याऐवजी पत्रक काढून कदम यांनी आघाडीचे नगरसेवक लेवे यांचा सातबारा मांडला. दोघांच्या आरोपांवरून पालिकेतील भ्रष्ट कारभार पुढे आला. वास्तविक लेवे हे पूर्वी आरोग्य सभापती होते. त्यांच्या काळातही भ्रष्टचार मोठ्या प्रमाणात झाला. तो त्या वेळी कदम यांनी पाठीशी घातला असणारच. बहुमताच्या जोरावरील भ्रष्टाचार आता पुढे येत आहे. 

निवडणुकीवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना त्यांच्या नेत्यांनी भुलवले. आघाडीच्या नेत्यांच्या इच्छेनुसार सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष झाली; पण सत्ताधाऱ्यांनी तिला काम करून दिले नाही. रंजना रावत नगराध्यक्षा असताना त्यांनाही रजेवर पाठविण्याचा पराक्रम साविआने केला होता. सत्ताधाऱ्यांना सातारकरांच्या समस्यांचे, शहराच्या विकासाचे काहीही देणेघेणे नसून पैसा कमावणे हाच एकमेव त्यांचा अजेंडा असल्याची टीकाही मोने यांनी पत्रकात केली आहे.

काेणावर भडकल्या नगराध्यक्षा, वाचा सविस्तर

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.