सातारा जिल्हा बॅंक मतदारसंघासाठी दहा व्हेंटिलेटर मशिन उपलब्ध दिले आहेत. महाबळेश्वर, वाई व खंडाळा येथे लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे.
वाई (जि. सातारा) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा covid19 third wave सामना करण्यासाठी वाई, खंडाळा, महाबळेश्वर wai khandala mahableshwar या तीन तालुक्यांमध्ये आत्तापासून 600 रुग्णांवर ऑक्सिजन orygen bed आणि व्हेंटिलेटर ventilator bed उपचार होतील, अशी व्यवस्था उभारण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासन, जिल्ह्यातील औद्योगिक व सामाजिक संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील makrand patil यांनी दिली. satara-marathi-news-covid19-mahableshwar-wai-khandala-makrand-patil-addressed-media-bed-management
आमदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुंबईतील जखोटे उद्योग समूहाच्या वतीने मतदारसंघासाठी 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध करून देण्यात आले. उद्योगपती प्रकाश जखोटे, सुजित देशमुख, उदय कबुले, शशिकांत पिसाळ, नितीन पाटील, डॉ. संदीप यादव, सुनील सनबे, राजूशेठ राजपुरे, प्रमोद शिंदे, राजेंद्र तांबे, मनोज पवार, दीपक ओसवाल, चरण गायकवाड, भारत खामकर, मामा देशमुख, नितीन मांढरे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ""वाई ग्रामीण रुग्णालय, मॅप्रो कोविड रुग्णालय, कवठे उपकेंद्रात ऑक्सिजनचे व व्हेंटिलेटर यंत्रणा उभारण्यात आली आहे. मॅप्रो रुग्णालयात आणखी बेड्स वाढविण्यात येत आहेत. खंडाळा ग्रामीण रुग्णालयात 32 ऑक्सिजन खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून याच परिसरात एशियन पेंटस् सुमारे दीड कोटी खर्चाचे अद्ययावत अतिदक्षता विभाग उभारत आहे.
येत्या तीन महिन्यांत हे रुग्णालय पूर्ण करण्यात येणार आहे. जगताप रुग्णालयात आणखी 150 ऑक्सिजन खाटा वाढविण्यात येणार असून त्यामुळे येथे 200 ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध होतील. गरज भासल्यास लोणंद येथेही रुग्णालय उभारण्यात येईल. तापोळा, डॉन ऍकॅडमी व बेल एअर रुग्णालयातही 200 ऑक्सिजन व व्हेंटिलेटर कक्ष सुरू आहे. सातारा जिल्हा बॅंक मतदारसंघासाठी दहा व्हेंटिलेटर मशिन उपलब्ध दिले आहेत. महाबळेश्वर, वाई व खंडाळा येथे लहान मुलांसाठीही स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे.''
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.