लस आली हाे...! आजपासून लसीकरण मोहीम पुन्हा पूर्ववत सुरू

कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन जिल्ह्याला टप्प्याटप्प्याने मिळत आहेत.
vaccination
vaccinationesakal
Updated on
Summary

कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन जिल्ह्याला टप्प्याटप्प्याने मिळत आहेत.

सातारा : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात लशीचा covid19 preventive vaccine साठा संपल्याने लसीकरण मोहीम vaccination drive ठप्प झाली होती. मात्र, रविवारी रात्री जिल्ह्याला 13 हजार 750 कोव्हिशिल्ड लशीचे covishield vaccine डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात लशीचे वाटप केले जाणार असल्याने आजपासून (सोमवार) लसीकरण मोहीम पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याचे लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले. satara-marathi-news-covishield-vaccine-available

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे. यामध्ये लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयासह आरोग्य केंद्रात मोठा प्रतिसाद मिळत होता. तसेच, दररोज 30 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवत लसीकरण केले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लशीचा साठा अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्याने मोहीम बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले होते. मात्र, सद्य:स्थितीत काही प्रमाणात लशीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे सात लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, सर्वाधिक लसीकरण कोव्हिशिल्ड लशीचे झाले आहे.

जिल्ह्यात रविवारी 13 हजार 750 कोव्हिशिल्ड लशीचे डोस उपलब्ध झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व जिल्हा रुग्णालयात विभागून लशीचे वाटप केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ठप्प झालेली लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा वेग घेत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.

530 रेमडेसिव्हिर उपलब्ध

कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन जिल्ह्याला टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. जिल्ह्यात रविवारी 530 रेमडेसिव्हिर उपलब्ध झाले असून, सर्वांत जास्त 54 इंजेक्‍शन कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलला मिळाली आहेत. तसेच, आज इंजेक्‍शनचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने रुग्णालयातील आयसीयू व ऑक्‍सिजन बेडच्या तुलनेत 25 टक्के रेमडेसिव्हिर मिळाली आहेत.

vaccination
साता-यात पाेलिसांची अरेतुरेची भाषा; व्यापा-यांना अटकेची धमकी?

आजपर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस : 5,98,850

दुसरा डोस : 1,12,241

एकूण लसीकरण : 7,11,091

रविवारचे ता. 23 लसीकरण : 66 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.