भिलार (जि. सातारा) : महू धरणात (mahu dam) सोमवारी दुपारी आजोबांबरोबर (grandfather) गुरे चारण्यासाठी गेलेला प्रणव संतोष गोळे (वय ११) हा मुलगा पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि पाण्यात बुडाला होता. गेले दोन दिवसांपासून ग्रामस्थ व महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान प्रणवचा शोध घेत होते. पोलिस धरणावर ठिय्या मांडून होते. परंतु प्रणवच्या ठावठिकाणा लागत नव्हता. आज (बुधवारी) प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबतची माहिती करहर पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार डी. जी.शिंदे यांनी दिली. (satara-marathi-news-drown-child-dead-body-found-mahu-dam-mahableshwar-trekkers)
प्रणवच्या मृतदेह सापडल्याचे समजताच संपूर्ण महू गाव धरणाकडे लोटला. यावेळी त्याच्या आई-वडिलांचा व कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली. आजोबांनी प्रणवला दिलेली हाक शेवटचीच ठरली. येथे जमलेल्या सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले होते. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे.
गेले दोन दिवसांपासून मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, कुडाळचे पाेलिस उपनिरीक्षक महेश कदम, करहरचे डी. जी.शिंदे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. शिंदे आणि पोलिस पाटील अक्षरशः ठिय्या मांडून होते. उपविभागीय अधिकारी सहायक पाेलिस निरीक्षक टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, अनिल लांगी, अमित झाडे, सौरभ साळेकर, आकेश धनावडे, दीपक झाडे, अमित कोळी, अक्षय नाविलकर प्रणवच्या शोधासाठी प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थही त्यांना सहकार्य करीत होते. अखेर आज सकाळी प्रणवच्या मृतदेह पाण्यावर तरंगत असताना सापडला. यामुळे महू गावावर शोककळा पसरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.