ठेक्यासाठी लाठ्या-काठ्या, तलवारी बाहेर काढल्या जातात; 'लोकशाही'ची खंत

Karad Municipality
Karad Municipalityesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : साडेचार वर्षात नगरपालिकेत (Karad Municipality) सत्ताधाऱ्यांनी कारभाराऐवजी त्याचा तमाशा केला आहे. अनेक नगराध्यक्ष झाले, मात्र या नगराध्यक्षांच्या लोकनियुक्त शब्दाने शहराचे अतोनात नुकसान केले आहे, असा आरोप लोकशाही आघाडीचे सुभाष पाटील (Lokshai Aghadi leader Subhash Patil) यांनी पत्रकार परिषदेत केला. आगामी पालिका निवडणूक लोकशाही आघाडी (Lokshai Aghadi) स्वबळावर लढणार आहे, असेही श्री. पाटील यांनी जाहीर केले. (Satara Marathi News Karad Lokshai Aghadi Subhash Patil Addressed Media)

Summary

साडेचार वर्षात कऱ्हाड नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी कारभाराऐवजी त्याचा तमाशा केल्याचा आरोप लोकशाही आघाडीच्या सुभाष पाटील यांनी केला आहे.

श्री. पाटील म्हणाले, साडेचार वर्षात पालिकेत निव्वळ खेळ झाला आहे. टेंडरसाठी पालिकेत लाठ्या, काठ्या व तलवारी बाहेर काढल्या जात आहेत. नगरसवेक एकमेकांवर धावून गेले आहेत. शहरात पालिकेच्या माध्यमातून कसलाच कारभार झालेला नाही. त्यामुळे आपण काय केले आहे, ते सत्ताधाऱ्यांनाच कळेना अशी स्थिती आहे. पालिकेतील लोकनियुक्त शब्दाने शहराचे अतोनात नुकसान केले. 1974 नंतर शहराला तीन लोकनियुक्त नगराध्यक्ष लाभले. त्यात ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील व 2001 मध्ये श्रीमती शारदाताई जाधव या दोघांनाही केलेल्या कामाचे आजही नाव काढले जाते. मात्र, आत्ताच्या नगराध्यक्षा एमआयएममुळे त्या पदावर पोचल्या आहेत. त्यांना शहातील केवळ 36 टक्के लोकांनी निवडले आहे. मग, यांना लोकनियुक्त म्हणावे का? असा प्रश्न आहे.

Karad Municipality
सरपंचांकडे २ मतदान ओळखपत्रे? पद रद्द करण्याची मागणी

50 टक्के लोकांनी लोकनियुक्त निवडले असेल, तर लोकनियुक्त म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्याच्या लोकनियुक्त कोणाच्या कृपेने निवडून आल्या आहेत. ते साऱ्यांनाच माहिती आहे. साडेचार वर्षात शहराचे नुकसान झाले आहे, लोकाभिमुख कारभार कसा करावा तो कसा हवा याची कसलीच जाण नसल्याचे दिसून आले. अनेक फायलींवर सह्या होत नसल्याने फायलींचा ढीग साचल्याचे दिसून आले. आमच्या काळात असं कधी झालंच नाही. मात्र, स्वतःचे अधिकार न कळलेल्या व कर्तव्य शून्य असलेल्या लोकनियुक्त लोकांच्या मनातून मागेच उतरल्याचा घणाघात करीत सुभाष पाटील म्हणाले, हातात पाईप धरून फवारणी करताना, कोविड मृतदेहाकडे पाठ करून पीपीई किट वाया घालवल्याचे संपूर्ण शहराने पाहिले आहे. कधी या नेत्याचे, तर कधी त्या नेतेचे ऐकून कारभार केला गेला.

Karad Municipality
मतदारांनाे! 'कृष्णा’ च्या निवडणुकीत असे करा मतदान

वाढीव हद्दीवर लक्ष देणार

शहरात समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. वाढीव हद्दीत मोठा गंभीर प्रश्न आहे. समस्या अजूनही कायम आहेत. त्या प्राधान्याने सोडवण्याचा आघाडी प्रयत्न करणार आहे. 2016 साली झालेल्या पालिका निवडणुकीत स्वबळावर लढलो. काही अंदाज चुकल्याने शहरातून मिळालेला कौल मान्य करून विरोधी आघाडीच्या भूमिकेत बसलो आहे. तेथेही आघाडीचे सहा नगरसेवक सक्षमपणे काम करत आहेत, असेही श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.

Satara Marathi News Karad Lokshai Aghadi Subhash Patil Addressed Media

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.