पुण्यात लग्न उरकून घरी परतलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अवघ्या 24 तासात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

सैदापुरातील विद्यानगर येथील उमराणी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
Coronavirus
Coronavirusesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : सैदापुरातील विद्यानगर येथील उमराणी कुटुंबावर काळाने घाला घातला. कोरोनामुळे (Coronavirus) चोवीस तासांतच आई, वडिलांसह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेमुळे विद्यानगरसह हळहळ व्यक्त होत आहे. मुलगा मिलिंद हरिभाऊ उमराणी, त्याच आई शीला हरिभाऊ उमराणी तर वडील केशव ऊर्फ हरिभाऊ पांडुरंग उमराणी अशी त्यांची नावे आहेत. तिघांचाही मृत्यू एका पाठोपाठ अवघ्या चोवीस तासात झाला आहे. (Karad Mother Father Son Died Covid19 Trending Satara Marathi News)

मिलिंद हरिभाऊ उमराणी पूर्वी कऱ्हाड शहरातील पंताचा कोट परिसरात राहत होते. ते सध्या कुटुंबीयांसह विद्यानगर येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले. लग्न समारंभासाठी कुटुंबीय पुणे येथे गेले होते. लग्न समारंभ उरकून ते पुन्हा विद्यानगरला आले होते. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वतःसह कुटुंबीयांची कोरोना टेस्ट केली. त्यात त्यांच्यासह त्यांची आई शिला, वडील हरिभाऊ यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी प्रयत्न करून आई-वडिलांसाठी रुग्णालयात बेड उपलब्ध केला.

Coronavirus
माशाच्या गळाला लागला बाँम्ब; घटनास्थळी पोलिसांसह ATS दाखल

आई, वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मिलिंद उमराणी व अन्य सदस्यांनी गृह विलगीकरणात उपचार घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांचे नातेवाईक संदीप देसाई यांच्याशी संपर्क करून घर सॅनिटायजर केले. सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाठवून उमराणी यांचे घर सॅनिटाईज केले. त्यानंतर कालावधीत दोन तीन दिवसात मिलिंद यांना खोकल्याचा जास्त त्रास जास्त होवू लागला. त्यामुळे त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री मिलिंद उमरानी यांचा मृत्यू झाला. त्यातून कुटुंबीय सावरत असतनाचा रविवारी रात्री त्यांचे वडील हरिभाऊ यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर आज सकाळी त्यांच्या आई शीला यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. चोवीस तासांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाची महाबळेश्वरला धडक; मुसळधार पावसात घरं, शाळांची पडझड

Karad Mother Father Son Died Covid19 Trending Satara Marathi News

Coronavirus
माणसाच्या नरडीचा घोट घेणारा 'देवमाणूस'!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.