कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रिया तूर्तास थांबली

त्याला मंगळवारपर्यंत मंजुरी अपेक्षित होती. मात्र, अद्यापही ती मंजुरी मिळालेली नाही.
Krishna Sahakari Sugar Factory
Krishna Sahakari Sugar Factoryesakal
Updated on

कऱ्हाड : शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (krishna sugar factory) संभाव्य प्रस्तावास निवडणूक प्राधिकरणाने (election commission) अद्यापही मंजुरी दिलेली नाही, अशी माहिती कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी दिली. त्यामुळे आजपासून (बुधवार) होणारी प्रक्रिया थांबली आहे. ज्या वेळी निवडणुकीचा (krishna sugar factory election) अधिकृत कार्यक्रम येईल, त्याच वेळी तो जाहीर करू, असेही श्री. आष्टेकर यांनी स्पष्ट केले. (satara marathi news krishna sugar factory election update)

नियमानूसार येत्या 20 दिवसांत निवडणूकीची तारीख जाहीर हाेऊ शकते

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजपासून (ता. 19) कार्यक्रम जाहीर करावा, असा प्राथमिक प्रस्ताव कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आष्टेकर यांनी प्राधिकरणाला दिला होता. त्याला मंगळवारपर्यंत (ता.18) मंजुरी अपेक्षित होती. मात्र, अद्यापही ती मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आजपासून जाहीर होणारा निवडणूक कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने अद्यापही काहीही माहिती अथवा पुढचा कार्यक्रम कळवलेला नाही, अशी माहिती श्री. आष्टेकर यांनी दिली.

Krishna Sahakari Sugar Factory
राज्यातील 159 पालिकांच्या निवडणुका पुढे जाणार?

ते म्हणाले, ""प्राधिकरणाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये बुधवारपासूनचा कार्यक्रम सुचवला होता. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून कोणताही कार्यक्रम आलेला नाही. तो कधी येईल, तेही सांगता येत नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.''

Krishna Sahakari Sugar Factory
सातारकरांनाे! सिव्हिलला निघालात? थांबा, RT-PCR लॅब पडलीय बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.