म्हसवड (जि. सातारा) : काेराेनाबाधित रुग्ण (covid19 patient) संख्येचा विचार करुन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज (साेमवार) म्हसवड प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) जाहीर केलेला यापु्र्वीचा आदेश पुर्ववतच ठेवला आहे. परिणामी सातारा जिल्हा अंशतः अनलाॅक (unlock) झालेला असला तरी म्हसवड (mashwad) शहर मात्र त्यास अपवाद ठरले आहे. (satara-marathi-news-mashwad-decleared-containment-zone-only-medical-shops-permited-to-open)
राज्यभरात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने राज्य शासनाने लॉकडाउनची नियमावली शिथिल करत राज्यभरातील विविध जिल्ह्यांचे पाच टप्पे केले आहेत. यामध्ये सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यासाठी नवीन अनलॉक नियमावली रविवारी (ता. सहा) जाहीर केली. यानुसार नवीन आदेशाची अंमलबजावणीस आजपासून (साेमवार) प्रारंभ झाला आहे.
आज जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये सकाळी नऊ पासून किराणा माल घेण्यासाठी नागरिक बाहेर पडले हाेते. याबराेबरच फळ, भाजीपाल्याचे गाडया, दुकाने पुन्हा ज्या त्या ठिकाणी लागल्याने त्या भागात नागरिकांची खरेदीसाठी रेलचेल हाेती. सातारा शहरात देखील आज (साेमवार) सकाळपासून राजवाडा, पाेवई नाका या परिसरात नागरिक किराणा माल, फळे, भाजी घेण्यासाठी येत हाेते. परिणामी रस्त्यावर वाहनांची वर्दळ हाेती.
दरम्यान जिल्ह्यातील म्हसवड या शहरातही आज (साेमवार) सकाळी नऊ पासून किराणा मालासह परवानगी देण्यात आलेली सर्व दुकाने खूली झाली हाेती. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु हाेते. रुग्ण संख्येचा विचार करुन प्रातांधिकारी सूर्यवंशी यांनी गावातील दुकाने अजून काही दिवस बंद ठेवण्यासाठी सर्वांना आवाहन करण्याची सूचना प्रशासकीय अधिका-यांना दिली.
त्यानूसार मुख्याधिकारी डाॅ. सचिन माने, सहायक पाेलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासमवेत पालिका कर्मचारी यांनी म्हसवड शहरात संयुक्तपणे फिरन दुकाने बंदचे आवाहन केले. काही व्यावसायिकांनी परवानगी दिली असताना असे का प्रश्न उपस्थित केला. त्यावर अधिका-यांनी सध्याची रुग्ण संख्या पाहता आम्ही आपणांस दुकाने बंद ठेवण्याची विनंती करीत आहाेत असल्याचे सांगितले. त्यानंतर एकेक व्यावसायिकाने दुकाने बंद करण्यास प्रारंभ केला.
दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत म्हसवड शहरात केवळ मेडिकल, कृषी विभागाची दुकाने, दूध वितरण, संकलन तसेच घरपाेच भाजीपाला आदी गाेष्टी सुरु राहतील असे प्रशासकीय अधिका-यांनी नमूद केले. नागरिकांनी आत्तापर्यंत केलेले सहकार्य असेच पुढं काही दिवस करावे असे आवाहनही केले.
दरम्यान सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क नसणाऱ्या व्यक्तींकडून 500 रुपये दंड आकारणेत यावा. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर रुपये 500 इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर दुकानावर 1000 रुपये इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल असेही निर्देश देण्यात आलेले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.