कास (जि. सातारा) : मेढ्याचे नगराध्यक्ष अनिल शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला. नगराध्यक्ष निवडीवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांना दिलेला शब्द शिंदे यांनी पाळला. नगराध्यक्ष शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे नेतृत्व करत नगरपंचायतीच्या प्रत्येक प्रभागामध्ये जातीने लक्ष घालत विकासकामांचा धडाका लावला.
नगराध्यक्ष शिंदे यांची प्रशासनातील अचूक पकड व विकासकामे पूर्णत्वाला जाण्याकरिता सतत पाठपुरावा ठेवत नगरपंचायतमधील राजकारण बाजूला ठेऊन मेढ्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नगरपंचायतीचा कारभार सांभाळल्यापासून अंदाजे दोन कोटी रुपयांची विकासकामे आणण्याचे प्रयत्न शिंदे यांनी केले.
श्री. शिंदेंनी नुकताच जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. या वेळी माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, माजी बांधकाम सभापती विकास देशपांडे, नगरसेवक नारायण देशमुख, संतोष वारागडे, बाळासाहेब आगाशे, गणेश सांवत, राजू नलावडे आदी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.