72 तासांपासून शहर अंधारात; महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु

पाचगणीत आजही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु
Panchgani
PanchganiSystem
Updated on

भिलार (जि. सातारा) : पाचगणी (panchgani) शहर व परिसरात वादळी वाऱ्याने (wind) हाहाकार माजवल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पाचगणीसह ग्रामीण भागात वीजपुरवठा (electricity) सुरू झाला नसून महावितरणचे (mahavitran) कर्मचारी हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुमारे तीन दिवसांपासून परिश्रम घेत आहेत. आजही बुधवार सकाळच्या प्रहरी महावितरणच्या कर्मचा-यांनी कामकाजास प्रारंभ केला आहे. (satara marathi news no power 72 hrs panchgani mahavitran)

Cyclone Tauktae : चक्रीवादळानं नुकसान झालंय?, महावितरणला द्या 'ही' माहिती

गेल्या तीन दिवसांत पावसासह वाऱ्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. बऱ्याच घरांवर, विजेच्या तारा, पोल, डीपीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. पालिका झाडे काढण्याच्या कामात व्यस्त आहे.

वीज वितरणचे कर्मचारी वीज सुरू करण्यासाठी धावपळ करीत आहेत. तब्बल 72 तास वीज नसल्याने पाचगणीकरांचा दिवसही अंधारात जात आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा, नेट सर्व्हिस, केबल सर्व्हिसवर परिणाम झाला आहे. बऱ्याच गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही बंद झाल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यामुळे लोक विजेच्या प्रतीक्षेत आहेत. महावितरणचे अभियंत्यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगितले हाेते. परंतु अद्यापही (बुधवार) वीज पुरवठा चालू झाला नसल्याने पाचगणी शहरात आजही अंधारच आहे.

Panchgani
महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.