NCP कार्यकर्त्याला मान खाली घालावी लागेल, ही तडजोड हाेणार नाही

Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. जिंकायच्या दृष्टीने काय करावं लागेल अन्‌ वारं कुठं वाहतंय, याचा अंदाज घेण्यासाठी मी माण तालुक्यात आलोय, असे सूचक वक्‍तव्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. (satara-marathi-news-ramraje-naik-nimbalkar-mann-market-committee-election)

येथे बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, जिल्हा परिषद सदस्य बाबासहेब पवार, उपसभापती तानाजी कट्टे, पंचायत समिती सदस्य नितीन राजगे, अभयसिंह जगताप, सुनील पोळ, प्रा. कविता म्हेत्रे, युवराज सूर्यवंशी, श्रीराम पाटील, विनय पोळ, तानाजी मगर, बाबूराव काटकर, बाळासाहेब काळे, जयप्रकाश कट्टे, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.

Ramraje Naik Nimbalkar
विधानमंडळाचे कामकाज आदर्शवत : रामराजे नाईक-निंबाळकर

रामराजे म्हणाले, ‘‘पुढील विधानसभेला तोंड देण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. राजकारणात आपले मूळ पक्के करण्याच्या या निवडणुका आहेत. ही मर्यादित मतांची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. लोकांना गृहित न धरता अत्यंत सावध पावलं टाकून ही निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मान खाली घालावी लागेल, अशी तडजोड होणार नाही.’’

सुनील माने म्हणाले, ‘‘भाजप हा एक नंबरचा शत्रू आहे, हे बघून 'आमचं ठरलंय' टीमला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असली पाहिजे. त्याचवेळी कार्यकर्त्यांचा सन्मान कमी होणार नाही, याची दक्षता घेऊ. राष्ट्रवादीच्या विचाराची पाठराखण करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. पक्षाचे काम न करता नेत्यांच्या कानाला लागणाऱ्या कार्यकर्त्यांचे लाड यापुढे पुरविले जाणार नाहीत.’’

Ramraje Naik Nimbalkar
ठेक्यासाठी लाठ्या-काठ्या, तलवारी बाहेर काढल्या जातात; 'लोकशाही'ची खंत

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘‘बाजार समितीची निवडणूक फक्त लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. त्यासाठी जे करावे लागेल, ते करायची तयारी आहे.’’ यावेळी श्रीराम पाटील, अंगराज कट्टे, सूर्याजी जगदाळे, विजय जगताप, संजय जगताप, दादासाहेब चोपडे यांनी मते मांडली. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब सावंत यांनी आभार मानले.

Ramraje Naik Nimbalkar
जयकुमार गोरे हे 'माण'साठी ऑक्‍सिजनच : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.