उदयनराजेंच्या प्रश्नांना निश्‍चितपणे उत्तर देणार : शेखर सिंह

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : कोरोनाच्या काळात (covid19 pandemic) जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) राबवीत असलेल्या उपाययोजनांबाबत खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून कोरोनाविषयी (coronavirus) असलेल्या २५ प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे आव्हान जिल्हाधिका-यांना दिले होते. याबाबत जिल्हाधिकारी सिंह यांना विचारणा केली असता, प्रश्‍न वाचल्यावर निश्‍चितपणे उत्तर देणार असल्याचे सांगत यावर त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. (satara-marathi-news-shekhar-sinh-answers-udayanraje-bhosale-questions-covid19-pandemic)

कोरोनाविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या 25 प्रश्‍नांची उत्तरे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून मागवली आहेत. यासाठीच्या प्रश्‍नावलीत उत्तर देण्याचे आव्हान करतानाच उत्तर देणार, की कायदेशीर ताकद दाखवणार? असा प्रश्‍नही राजेंनी उपस्थित केला आहे.

Udayanraje Bhosale
हताश झालो, डगमगलो नाही; ऑलिंपिकला देशाचा झेंडा फडकविणारच!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी श्री. सिंह यांना याबाबत छेडले असता. त्यांनी अद्याप प्रश्न वाचलेले नाहीत असे सांगून अधिक बाेलणे टाळे. यावेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

Udayanraje Bhosale
12.50 कोटी लोकांचे रोजगार गेले, 23 कोटी दारिद्य्ररेषेखाली; मोदी सरकार नेमकं काय करतंय?

उदयनराजेंनी जिल्हाधिका-यांना विचारलेले प्रश्न


कोविडवर नेमके औषध उपलब्ध आहे का? असल्यास त्यापैकी आपल्याकडे कोणते आहे?

नेमके औषध नसेल तर गेले वर्षभर कोणत्या औषधांचा वापर उपचारासाठी झाला?

उपचारापद्धतीतील औषधांचा काळाबाजार झाला व नंतर ती बंद करण्यात आली, मृताची ऍटॉप्सी का केली जात नाही?

एकाच व्यक्‍तीच्या वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष कसे येतात?

लॉकडाउन असतानाही रुग्णसंख्या वाढीची कारणे काय?

रुग्णसंख्येचा वेग मंदावण्यास उशीर का झाला?

आकडेवारीतील घोळामुळे रुग्णसंख्या वाढत होती का?

अहवाल सादर करण्यात वेळ येत होता तर बाकी माहिती जाहीर होताना बाधितांचा आकडा काय?

अहवालातील घोळाप्रकरणी दोषींवर काय कारवाई केली?

कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग का झाले नाही, तिसरी लाट येणार असल्याचे सांगत असताना त्यामागील आधार काय, फिरणाऱ्या नागरिकांची जबरदस्तीने तपासणी करणे कोणत्या नियमावलीत बसते, वीकेंड लॉकडाउनसाठी कोणता तर्क, आधार लावला आहे, आयुर्वेदिक उपचारपद्धतीला शासन अधिकृतता का देत नाही?

Udayanraje Bhosale
आत्महत्या रोखूया, चला बांधू मानसमैत्रीचे पूल

हे प्रश्‍न सर्वसामान्य, कष्टकरी, सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित केले असून, आम्हालाही लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या तळाशी जाणे आवश्‍यक वाटते. या प्रश्‍नांची समर्पक, विस्तृत उत्तरे जनतेच्या हितासाठी आपण द्याल, अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्‍त केली आहे.

Udayanraje Bhosale
शुगर आहे?...तुम्हाला लस नाही! ज्येष्ठ नागरिक लशीपासून वंचित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.